Hyundai NEXO FCEV: 2.64 kWh बॅटरी, 700 किमी रेंजसह लाँच झाली ‘हि’ कार; पहा फीचर्स अन संपूर्ण माहिती

Hyundai NEXO FCEV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hyundai NEXO FCEV- हुंडईने आपली नवीनतम हायड्रोजन एसयूवी, हुंडई नेक्सो FCEV, (Hyundai NEXO FCEV ) सियोल मोबिलिटी शोमध्ये सादर केली आहे. ही हायड्रोजन इंधन सेल (FCEV) वाहन पर्यावरण आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक आदर्श पर्याय ठरते. यामध्ये उच्च कार्यक्षमतेचे हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान, जलद इंधन भरण्याची सुविधा, तसेच आकर्षक डिझाइन अन अत्याधुनिक इंटीरियर्स आहेत. जे ग्राहकांना जास्त आकर्षित करताना दिसत आहे. तर चला या गाडीच्या फीचर्स अन किंमत बदल अधिक जाणून घेऊयात.

Hyundai NEXO FCEV फीचर्स –

हुंडई नेक्सो FCEV हायड्रोजन इंधन सेल प्रणालीवर आधारित आहे, ज्यामुळे ती एकदाच इंधन टाकी फुल केल्यानंतर 700 किलोमीटरपर्यंत चालवता येते. विशेष म्हणजे, हायड्रोजन टाकी फुल करण्यासाठी केवळ 5 मिनिटांचा वेळ लागतो, जो बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग वेळेपेक्षा अत्यंत कमी आहे. यामुळे, हुंडई नेक्सो FCEV लांब अंतराच्या प्रवासासाठी आणि दुरवस्थेच्या परिस्थितीत एक आदर्श पर्याय ठरतो . तसेच FCEV चे डिझाइन अत्याधुनिक अन आकर्षक आहे. ‘आर्ट ऑफ स्टील’ या विशेष डिझाइन शैलीचा समावेश असलेल्या या एसयूवीमध्ये दमदार लुक आणि स्टायलिश HTWO LED हेडलाइट्स आहेत. तसेच, चौकोर खिड़क्या, मोटे सी. पिलर आणि ब्लॅक फेंडर फ्लेयर्स यांसारख्या डिझाइन घटकांमुळे ही कार आणखी प्रभावशाली दिसते. फ्लश डोर हँडल्स आणि प्रीमियम लुकच्या इतर फीचर्सने ही कार एक स्पोर्टी आणि प्रीमियम अनुभव प्रदान करते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर –

Hyundai NEXO FCEV च्या इंटीरियर्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये 123 इंचाचा डिजिटल मीटर आणि 12.3 इंचाचा टचस्क्रीन एकत्रित करण्यात आले आहेत. याशिवाय, 12 इंच हेड-अप डिस्प्ले, 14-स्पीकर बॅंग अँड ओल्फसेन साउंड सिस्टम, डिजिटल रियर व्ह्यू मिरर, वायरलेस चार्जर आणि स्टिम क्लायमेट कंट्रोल पॅनेल यांसारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश आहे.

Hyundai NEXO FCEV मध्ये बॅटरी –

हुंडई नेक्सो FCEV मध्ये 2.64 kWh बॅटरी आहे, जी हायड्रोजन इंधन सेलद्वारे सतत चार्ज होते. या वाहनामध्ये 201 बीएचपी च्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आलेला आहे, जो 0 ते 100 किमी/तास 7.8 सेकंदात पोहोचवतो. तसेच, या कारमध्ये 6.69 किलो हायड्रोजन टाकी आहे, ज्यामुळे ती दीर्घ अंतर पार करू शकते. हुंडई नेक्सो FCEV हा एक पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत आणि दीर्घकालीन पर्याय म्हणून भविष्याकडे एक मोठे पाऊल आहे. त्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, हा वाहन भविष्यातील कार तंत्रज्ञानाचे एक अभिनव आणि अग्रगण्य उदाहरण ठरते.