Ibrahimpur Village : कोल्हापुरातील अनोखे मुस्लिम गाव; ‘इथे’ पुजले जातात हिंदू देवी- देवता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ibrahimpur Village) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाचे एक वैशिट्य आहे. गावागावात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि इतिहासाचे जतन केलेले आहे. त्यात कोल्हापूराचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतो रंकाळा तलाव. इतकंच काय तर अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड आणि तांबडा पांढरा. याशिवाय मातीतली कुस्ती आणि रांगड्या लोकांचं प्रेमळ गाव म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. मात्र कोल्हापुरातील एका गावाची गोष्टच वेगळी आहे. या गावाचे नाव मुस्लिम आहे. पण गावात हिंदू देवतांची प्राचीन मंदिरे आहेत. आपण ज्या गावाबद्दल बोलतोय त्याच नाव आहे ‘इब्राहीमपूर’.

‘असं’ हे इब्राहीमपूर (Ibrahimpur Village)

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वसलेले इब्राहिमपूर हे गाव फार विशेष आणि अनोखे आहे. या गावाचे नाव मुस्लिम आहे. मात्र या गावामध्ये अत्यंत प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. येथील शिवमंदिरात दूरवरून भाविक येत असतात. याशिवाय इब्राहीमपूरात पावणाई देवीचे मंदिर आणि पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर देखील आहे. ही दोन्ही मंदिरे स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरण आहेत. साधारण ८०० ते ९०० वर्षांपूर्वी ही मंदिरे बांधली असल्याचे सांगितले जाते. दगडाच्या शिळा आणि केलेले कोरीव काम खरोखरच पाहण्यासारखे आहे.

इब्राहीमपूरमधील प्राचीन शिवमंदिर

इब्राहिम गावातील हे शिवमंदिर अत्यंत प्राचीन असून १० व्य ते ११ व्या शतकात बांधल्याचे ,म्हटले जाते. अर्थात आजपासून सुमारे ९०० वर्षांपूर्वी हे मंदिर उभारण्यात आले होते. (Ibrahimpur Village) या मंदिराचे बांधकाम भुमीज शैलीत केलेले दिसून येते. तसेच या मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग आहेत. या मंदिराचे शिखर दगडी बांधकामातील असून आजही अत्यंत सुस्थित आहे. माहितीनुसार, हे शिवमंदिर चालुक्य साम्राज्यातील आहे.

शिलाहार राजाच्या नेतृत्वाखाली या मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम करण्यात आले होते. या मंदिरात काही सतीशिळा देखील पहायला मिळतात. पूर्वीच्या काली पतीच्या मृत्यूनंतर पत्नी सतीला जायची. (Ibrahimpur Village) या महिलेच्या स्मरणार्थ अशा शिळा बनवल्या जायच्या. अत्यंत पुरातन मंदिर असूनही या मंदिराविषयी फार लोकांना माहित नाही.

पावणाई देवी मंदिर

महादेवाच्या मंदिरापासून जवळच पावणाई देवी मंदिर आहे. पावणाई म्हणजे पार्वती देवी. अत्यंत पुरातन पद्धतीने हे मंदिर इब्राहीमपूर येथे पहायला मिळते. जिथे वीरगडी आणि पावणाई देवीची अत्यंत सुंदर अशी दगडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते. फार कमी ठिकाणी पार्वती मातेची मंदिरे पहायला मिळतात. त्यापैकी एक इब्राहीमपूर (Ibrahimpur Village) येथे आहे.

पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर

पावणाई देवीच्या मंदिरापासून पुढे गेल्यावर २ जैन मंदिरे पहायला मिळतात. या दोन्ही मंदिरांचे बांधकाम दगडी हेमांडपंथी शैलीतील आहे. इथे भगवान पार्श्वनाथांची मूर्ती देखील दगडात कोरलेली दिसते. (Ibrahimpur Village) जी ९०० वर्षांपूर्वीची असून आजही आहे तशीच आहे. मंदिराच्या घुमटावर आणि भिंतींवर केलेले दगडी कोरीव काम इतके सुबक आणि सुंदर आहे की पाहता क्षणी भूल पडते. बहुतेकवेळा ही मंदिरे बंद असल्याचे सांगितले जाते.

कसे जाल?

कोल्हापुरातील गडहिंग्लजपासून इब्राहिमपूरला जाण्याचा मार्ग आहे. गडहिंग्लज- अडकुर- इब्राहिमपूर असा प्रवास करून या मंदिरांना भेट देता येईल. विशेष बाब अशी की, इब्राहीमपूर गावाचे नाव जरी मुस्लिम असले तरी येथे हिंदू देवी देवतांची मंदिरे आहेत. त्यांची पूजा केली जाते. (Ibrahimpur Village) त्यामुळे खरोखरच सर्व धर्म समभाव याची अनोखी आणि दैवी प्रचिती या गावात येते.