ICC T20I Team of The Year : ICC ने जाहीर केला सर्वाेत्कृष्ट टी-20 संघ; रोहित शर्मा कर्णधार

0
1
ICC T20I Team of The Year
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC T20I Team of The Year – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने 2024 च्या सर्वोत्कृष्ट टी-20 संघाची घोषणा केली आहे. या संघात एकूण 4 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे, आणि कर्णधारपद भारताच्या टी-20 विश्वचषक विजेत्या कर्णधार रोहित शर्माला दिले आहे. 2024 मध्ये भारताने आयोजित केलेला टी-20 विश्वचषक 17 वर्षांच्या कालावधीनंतर जिंकला, आणि याच संघातील खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. तर चला सर्वोत्कृष्ट टी-20 संघात कोण कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे याची अधिक माहिती पाहू.

संघात भारताचाच दबदबा (ICC T20I Team of The Year) –

आयसीसीच्या 2024 च्या सर्वोत्कृष्ट टी-20 संघात भारताचाच दबदबा पाहायला मिळाला आहे. यामध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या चार खेळाडूंनी 2024 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये असामान्य कामगिरी केली, विशेषत: टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात.

अन्य देशातील काही खेळाडूंना संधी –

2024 च्या सर्वोत्कृष्ट टी-20 संघात (ICC T20I Team of The Year) भारताशिवाय अन्य देशांमधून काही खेळाडूंना संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, इंग्लंडचा फिल स्लॉट, पाकिस्तानचा बाबर आझम, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा या खेळाडूंनाही संघात स्थान दिले आहे. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला यष्टीरक्षक (wicket keeper) म्हणून निवडले गेले आहे.

ICC 2024 सर्वोत्कृष्ट टी-20 खेळाडू –

रोहित शर्मा (कर्णधार)
हार्दिक पांड्या
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंग
ट्रॅव्हिस हेड
फिल स्लॉट
बाबर आझम
निकोलस पूरन (यष्टीरक्षक)
सिकंदर रझा
रशीद खान
वानिंदू हसरंगा

विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी –

संपूर्ण संघाने 2024 मध्ये टी-20 (ICC T20I Team of The Year) क्रिकेटच्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे आयसीसीने या खेळाडूंना मान्यता दिली आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयाने या संघात भारतीय खेळाडूंचा दबदबा आणखी मजबूत केला आहे.

हे पण वाचा : टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव? BCCI चा निर्णय काय?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज