ICMR Guidelines : आता गृहिणींना बदलावी लागणार जेवणाची पद्धत; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ICMR Guidelines : आपले आरोग्य हे पूर्णपणे आपण घेत असलेल्या अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण चांगला आहार घेतला तर आरोग्यही चांगले राहते यात शंका नाही. मात्र हल्लीच्या काळात मात्र जीवनशैली बदलल्यामुळे अन्नपदार्थ बनवण्याची पद्धत तसेच त्याची प्रक्रिया देखील बदलत चालली आहे. त्यामुळे त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. म्हणूनच ICMR ने आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चला जाणून घेऊया…

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR Guidelines) च्या अहवालात असे समोर आले आहे की भारतातील 56.4 टक्के आजारांचे कारण अन्नाशी संबंधित चुका आहेत.ICMR ने 17 आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ICMR अंतर्गत कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) म्हणते की निरोगी आहार आणि शारीरिक हालचालींद्वारे कोरोनरी हृदयरोग आणि उच्च रक्तदाब टाळता येऊ शकतो.NIN म्हणते की जर तुम्ही तुमचा आहार योग्य ठेवला तर टाइप 2 मधुमेहाचा धोका 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

NIN ने या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहारासंबंधी इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. वैज्ञानिक परिणाम, जीवनशैलीतील बदल, आजार आणि खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन एनआयएनने या सूचना जारी केल्या आहेत. आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की लोकांनी कमी मीठ खाण्याची सवय लावावी. कमी साखर आणि अतिप्रक्रियायुक्त पदार्थांपासून दूरच राहावे आणि शक्य तितके शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहावे. निरोगी जीवनशैलीने आपण लठ्ठपणा टाळू शकतो. हा आहाराचा मसुदा ICMR-NIN च्या संचालक हेमलता आर यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांच्या समितीने (ICMR Guidelines) तयार केला आहे.

कसा असावा आहार ? (ICMR Guidelines)

एनआयएन च्या सूचनेनुसार लोकांनी संतुलित आहाराचे पालन केले पाहिजे ज्यामध्ये 45 टक्के कॅलरीज धान्यापासून, 15 टक्के कॅलरीज डाळी, बीन्स किंवा मांस यांमधून याव्यात आणि उर्वरित कॅलरीज काजू, भाज्या, फळे आणि दुधामधून घेता येतील. आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे की, देशात डाळी आणि मांसाच्या चढ्या किमतींमुळे बहुतेक लोक कॅलरीजसाठी धान्यावर अवलंबून असतात.

काय आहेत आयसीएमआरच्या इतर मार्गदर्शक सूचना

  • प्रेशर कुकिंग- वाफेच्या दाबाखाली अन्नपदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. या पद्धतीत अन्नातील विटामिन आणि मिनरल कमी होत नाहीत.
  • तळणे– या पद्धतीनं अन्नातील स्निग्धतेचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळं हृदयविकारांचा धोका बळावतो. त्यामुळं शक्यतो ही सवय टाळा.
  • उकडणे आणि वाफवणे- या पद्धतीमध्ये पदार्थातील पाणी शोषून ठेवणारे घटक स्थित राहून ते पदार्थ अधिक पोषक करतात.
  • मायक्रोवेवचा वापर – किमान वेळात जेवण बनवणाऱ्या या पद्धतीमध्ये पोषक तत्त्वंही नष्ट होत (ICMR Guidelines) नाहीत.

जेवण बनवताना योग्य भांड्यांचा वापर (ICMR Guidelines)

स्वयंपाक करीत असताना आपण ज्या भांड्यांमध्ये जेवण बनवत असतो टी भांडी देखील महत्वाची आहेत. कारण जेवण बनवत असताना हीटिंग प्रोसेस होत असते. म्हणून भांड्यांकरिता देखील मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात आली आहेत. (ICMR Guidelines)

  • ग्रेनाईट अथवा दगडाची भांडी– ही भांडी नॉनस्टीकच्या तुलनेत अधिक सुरक्षित समजली जातात. फक्त त्यावर रसायनांचा थर नाही, याची मात्र काळजी घ्यावी.
  • टेफ्लॉनचा थर असणारी नॉनस्टीक भांडी– या भांड्यांमध्ये जेवण करत असताना ती मोठ्या आचेवर न ठेवता त्यातून धूर निघणार नाही याची काळजी घ्या.
  • धातू आणि स्टेनलेस स्टील- या प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण बनवणं अतिशय सुरक्षिकत असतं.
  • मातीची भांडी – अन्नपदार्थांच्या चवीसोबतच त्यातील पोषक तत्त्वं वाढवण्यासाठीसुद्धा मातीची भांडी फायदेशीर ठरतात. पण, त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाणं तितकंच महत्त्वाचं.