हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IDBI बँकेने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) योजनांमध्ये मोठे बदल केले असून , आता त्यांनी नवीन कालावधी आणि अधिक व्याजदर असलेल्या एफडी योजना सादर केल्या आहेत. तसेच बँकेने आपल्या पूर्वीच्या विशेष एफडी योजनांच्या गुंतवणुकीची अंतिम मुदतही वाढवली आहे. हि नवीन FD योजना 555 दिवसांच्या कालावधीची असून , या योजनेत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल. मात्र, या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्यास परवानगी नाही.
555 दिवसांच्या कालावधीची FD योजना –
नवीन 555 दिवसांच्या कालावधीची उत्सव एफडी योजना हि फायदेशीर ठरणार आहे. तसेच पूर्वीपासून सुरू असलेल्या 300, 375, 444 आणि 700 दिवसांच्या विशेष एफडी योजना आता 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. उत्सव एफडीवरील व्याजदर सामान्य नागरिकांसाठी कालावधीनुसार वेगवेगळे आहेत. 300 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदर 7.05% आहे, तर 375 दिवसांच्या एफडीसाठी 7.25% व्याज दर मिळते . 444 दिवसांच्या एफडीसाठी 7.35% आणि 555 दिवसांच्या नव्या योजनेसाठी 7.40% व्याजदर आहे, जो तुलनेने अधिक लाभकारी ठरतो. 700 दिवसांच्या एफडीसाठी व्याजदर 7.20% आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आकर्षक –
उत्सव एफडीवरील व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आकर्षक आहेत. 300 दिवसांच्या एफडीसाठी 7.55% व्याज दर आहे, तर 375 दिवसांच्या कालावधीसाठी 7.75% व्याज मिळते. 444 दिवसांच्या एफडीसाठी 7.85% व्याजदर आणि 555 दिवसांच्या नव्या योजनेसाठी 7.90% व्याजदर आहे, जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरतो. 700 दिवसांच्या एफडीसाठी 7.70% व्याजदर मिळतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक व्याजदराचा फायदा होतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होऊ शकते.
सामान्य एफडीवरील व्याजदर –
सामान्य एफडीवरील व्याजदर 3.35% ते 7.30% पर्यंत असतात, आणि हे दर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही व्याजदर 3.50% ते 7.50% पर्यंत असतात, जे त्यांना अधिक आकर्षक ठरतात. तसेच मुदतपूर्व एफडी बंद करण्याच्या बाबतीत, ग्राहकावर बँक 1% पेनल्टी शुल्क आकारले जाते . हे शुल्क प्रामुख्याने पैसे काढण्यावर आणि स्विप-इन सुविधांवरही लागू असते, ज्यामुळे एफडीचे लवकर बंद करण्यावर अतिरिक्त शुल्काचा भार पडतो. यामुळे ग्राहकांना एफडी बंद करण्याआधी सर्व शर्ती आणि शुल्कांचा विचार करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.