मकर संक्राती जवळ आली की पतंगाचा उत्सव सुरु होतो. त्यामुळे पतंग आणि मांजा खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी वाढू लागते. खरंतर कायद्याने नॉयलॉन मांजाला बंद आहे. तरीदेखील सर्रास पणे मांजा खरेदी – विक्री होताना दिसते. मात्र यंदा नॉयलॉन मांजा आणि त्याद्वारे होणाऱ्या दुर्घटनांमधुन वाचण्यासाठी पुणे पोलिसांनी चंग बांधला आहे.
आई वडिलांवर दाखल होणार गुन्हे
आता अल्पवयीन मुलं नायलॅान मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली. त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीत आपलं मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो, यावर पालकांना लक्ष ठेवावं लागणार आहे. तसं न केल्यास थेट आई वडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यामुळे आई वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात कारवाई सुरुच आहे. मागच्या १५ दिवसात अनेक ठिकाणी कारवाया केल्या असून लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.तरी देखील रस्त्यावर अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करत पंतग उडवल्याचं उघडकीस आलं आहे.
केवळ दैव बलवत्तर म्हणून
पुण्यमूध्ये अगदी ३ दिवसांपूर्वी नायलॅान मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरूणाला ३२ टाके घालावे लागले. तर दुसऱ्या एका घटनेत शाळकरी मुलगी सुद्धा मांजामुळे जखमी झाली आहे. अशा घटना आणखी घडू नयेत याकरिता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली असून नॉयलॉन मांजा बाबत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.