हनिमूनसाठी कमी गर्दीचं ठिकाण शोधताय? मुंबई, पुण्यापासून जवळ असणारे ‘हे’ थंड हवेचे ठिकाण आहे बेस्ट पर्याय

Igatpuri hill station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Igatpuri hill station)सध्या सर्वत्र कडाक्याचा उन्हाळा सुरु असून अनेकजण उन्हाळी ट्रिपचा प्लॅन आखत आहेत. बाहेर सर्वत्र उष्णता असताना अशा दिवसांत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे नियोजन केले जाते. अनेकदा नव्याने लग्न झालेली जोडपी हनिमूनसाठी (Best hill stations in Maharashtra for couples) कमी गर्दीची ठिकाणे शोधात असतात. पुणे, मुंबई सारख्या शहरांतून पर्यटक मे महिन्यात महाबळेश्वर किंवा माथेरानला जाणे पसंद करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका थंड हवेच्या ठिकाणाबाबत माहिती सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्ही याअगोदर ऐकले नसेल. तुम्हाला आध्यात्मिक वातावरण आणि थंड हवा याचा एकत्रित आनंद घ्यायचा असेल तर यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत या ठिकाणाला नक्की भेट द्या.

थंड हवेचे ठिकाण म्हटले कि लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, माथेरान हि महाराष्ट्रातील ठिकाणे डोळ्यासमोर येतात. परंतु आज आम्ही तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri hill station) या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहोत. कारण इगतपुरी हे अडवेंचर, ट्रेकिंग, साहसी खेळ यासोबतच मेडिटेशन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.

इगतपुरी नक्की आहे कुठे? Igatpuri hill station

इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. मुंबईपासून इगतपुरी सुमारे १२० किमी तर पुण्यापासून २४० किमी दूर आहे. मुंबईतून नाशिककडे येताना इगतपुरी लागते तर पुण्याहून राजगुरूनगर, संगमनेर मार्गे नाशिककडे येताना इगतपुरी लागते. तुम्ही विदर्भातून येणार असाल तर अकोल्यापासून ४५० किमी अंतरावर इगतपुरी आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर असणारे इगतपुरी हे ठिकाण मुंबई-नाशिक महामार्गावर असल्याने रस्त्याने आणि रेल्वेने सहज पोहोचता येण्यासारखं आहे.

इगतपुरी साहसी क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध (Adventure Tourism in Igatpuri)

इगतपुरी हे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेलं असल्यामुळे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक सुंदर ट्रेक्स, डोंगराळ वाटा, आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे ट्रेकिंग प्रेमींसाठी सर्वात आवडीचं ठिकाण मानलं जात.

इगतपुरीमध्ये काय काय पाहण्यासारखे आहे? (Places to visit in Igatpuri)

  • विहिगाव धबधबा (Vihigaon Waterfall Rappelling) – दाट जंगलांच्या मध्ये वसलेला हा धबधबा पावसाळ्यातील मुख्य आकर्षण आहे. साहस प्रेमींना इथे वॉटर रॅपलिंग करण्यासाठी येतात.
  • कॅमल व्हॅली (Camel Valley) – इगतपुरीपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण नैसर्गिक फोटोसाठी प्रसिद्ध आहे. हिरवाईने नटलेली पर्वतरांगं आणि पावसाळ्यात निर्माण होणारे लहान-मोठे धबधबे हे येथे विशेष आकर्षण ठरतात.
  • भातसा नदी खोरे (Bhatsa River Valley) – इगतपुरी घाटाच्या पायथ्याशी असलेलं हे खोऱं निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी स्वर्गच आहे. इथं असलेलं घाटादेवी मंदिर आध्यात्मिक शांतीचा अनुभव देतं.
  • धम्मगिरी विपश्यना केंद्र (Vipassana center Igatpuri) – धम्मगिरी विपश्यना केंद्र (Dhamma Giri Vipassana Center) हे इगतपुरीचं सर्वात प्रसिद्ध आणि जागतिक दर्जाचं ध्यान प्रशिक्षण केंद्र आहे. १९७६ मध्ये एस.एन. गोयंका यांनी स्थापन केलेलं हे केंद्र आजही जगभरातून येणाऱ्या साधकांसाठी एक महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे घेतली जाणारी १० दिवसांची मौन साधना (Vipassana Retreat) ही पूर्णपणे मोफत असून ती प्राचीन बौद्ध ध्यान पद्धतींवर आधारित आहे. येथील सुवर्ण पगोडा आणि शांत परिसर मानसिक शांती आणि आत्मचिंतनासाठी अतिशय योग्य आहे.