IMD Weather Update: पावसाचं ‘ऑपरेशन अलर्ट’ सुरू ! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, 18 जिल्हे रेड झोनमध्ये

_Weather Update (2)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IMD Weather Update:महाराष्ट्र पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार घेरावात सापडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने १८ जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवत, नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा लहरी खेळ आता धोक्याच्या स्तरावर पोहोचला आहे.

‘लो प्रेशर बेल्ट’चा तडाखा

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश ते कोकणपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल घडत आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे.वामान खात्याने स्पष्ट सांगितलं आहे. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता प्रबळ आहे.

१८ जिल्हे ‘रेड अलर्ट’वर

आज (८ मे) खालील जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे: कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र विभागात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), अहिल्यानगर (नगर), जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, वाशिम, बुलढाणा तर विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

९ मेला विदर्भात मुसळधार पावसाचा धोका

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांना ९ मे रोजी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी महत्त्वाची कामं पुढे ढकलावी आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईत वाहतूक विस्कळीत

मुंबई आणि उपनगरांमध्ये कालच्या वादळी पावसामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका बसला.ओव्हरहेड वायरवर झाडे आणि फांद्या कोसळल्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांचा वेळ वाया गेला, तर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.

काय काळजी घ्याल ?

घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घ्या
वादळाच्या सूचना आल्यास घरात सुरक्षित राहा
वीजेच्या खांबांपासून दूर राहा
शेतीची कामं पुढे ढकलण्याचा विचार करा
रेल्वे व फ्लाइट अपडेट्स तत्परतेने तपासा