हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशातील आकडेवारीनुसार अनेक महागड्या गाड्या एका रात्रीत चोरीला जात आहेत. काही वेळा हे प्रकार कार मालकांच्या हलगर्जीपणामुळे घडतात. त्यामुळे गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी काही खबरदारीचे उपाय करणे गरजेचे आहे. योग्य खबरदारी घेतल्यास कार चोरीला जाण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही असेल उपाय सांगणार आहोत , ज्यामुळे तुमची गाडी कधीच चोरीला जाणार नाही. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कार सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स –
सुरक्षित ठिकाणी पार्क करा –
कार पार्क करताना नेहमी सुरक्षित आणि लोकवस्तीच्या ठिकाणीच गाडी लावा. अंधाऱ्या किंवा एकांत जागेवर गाडी लावणे टाळा. तसेच CCTV असलेल्या पार्किंगची निवड केल्यास कार सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते. प्रवासादरम्यान काही लोक खिडक्या उघड्या ठेवतात. मात्र घाट, जंगल किंवा अज्ञात ठिकाणी जाताना खिडक्या आणि दरवाजे व्यवस्थित लॉक करणे खूप गरजेचे आहे. खिडक्या उघड्या ठेवल्यास चोरट्यांना गाडी चोरणे सोपे जाते. त्यामुळे आपले मोठे नुकसान होते. यासाठीच आपण हि खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अलार्म सिस्टीम बसवा –
कार चोरीला जाण्यापासून वाचण्यासाठी कारमध्ये चोरीविरोधी अलार्म सिस्टीम बसवणे अत्यंत फायदेशीर ठरते. अलार्मचा आवाज चोरांना गाडीच्या आसपास फिरण्यापासून रोखतो. जर तुमच्या कारमध्ये अलार्म सिस्टम नसेल, तर तज्ञांच्या मदतीने ती बसवून घ्या. तसेच कारमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाइस बसवल्यास गाडी चोरीला गेल्यावर तिची लोकेशन ट्रॅक करता येते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे तुमच्या फोनवरूनच कारची अचूक स्थिती समजू शकते.
स्टीयरिंग व्हील लॉक लावा –
स्टीयरिंग व्हील लॉकसारखे उपकरण चोरांना कार चोरी करण्यापासून परावृत्त करते. त्यामुळे अशा उपकरणांचा वापर करा. कारमध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन किंवा अन्य मौल्यवान वस्तू उघड्यावर ठेवणे टाळा. चोरांना आकर्षण वाटू शकते. जर वस्तू ठेवाव्या लागल्या, तर त्या झाकून ठेवा. कार चोरीला जाणे हा मालकासाठी मोठा धक्का असतो. त्यामुळे गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी वरील उपायांचा अवलंब करा. सतर्क राहिल्यास कार चोरीचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो.
हे पण वाचा : घरबसल्या कळणार ‘लालपरीचे लाईव्ह लोकेशन’ ; गाडयांना बसवण्यात आली VTS सिस्टीम