Income Tax Rules : तुम्हीही करता ‘असे’ व्यवहार? तर सावधान!! आयकर विभाग कधीही नोटीस पाठवेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Income Tax Rules) आपल्या दैनंदिन शैलीत आपण अनेक छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत असतो. यातील प्रत्येक व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे आयकर विभागाच्या नियमाबाहेर जाऊन कोणतेही व्यवहार करणे आपल्या अंगलट येऊ शकते. आजकाल अनेक लोक ऑनलाईन देखील आर्थिक व्यवहार करतात. अगदी मोठमोठ्या रक्कमेचे व्यवहार ऑनलाईन स्वरूपात सोप्या पद्धतीने होतात.

त्यामुळे बरेच लोक ऑनलाईन तर काही ऑफलाईन देखील व्यापार करतात. पण असे व्यवहार करताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर समजा तुमची वाट लागलीच. कारण तुमच्या प्रत्येक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवणारं आयकर विभाग या चुकांसाठी तुमच्यावर मिनिटांत कारवाई करू शकत. (Income Tax Rules) याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आयकर विभागाकडून नवीन आर्थिक वर्षांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र ITR भरताना जरा जपून. कोणतीही चूक झाली तर तुम्हाला महागात पडू शकते. तर कोणत्या चुका झाल्याने कारवाईला तोंड द्यावे लागेल याविषयी जाणून घेऊया.

प्रॉपर्टी व्यवहार (Income Tax Rules)

जर तुम्ही प्रॉपर्टी रजिस्ट्रारसोबत रोखीने मोठा व्यवहार करत असाल तर याचा पूर्ण रिपोर्ट प्राप्तिकर विभागाकडे जातो. त्यामुळे एका आर्थिक वर्षात ३० लाख वा त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता तुम्ही रोख स्वरूपात खरेदी करत असाल तर त्याची नोंदणी आणि मुद्रांक विभाग अशा व्यवहारांची माहिती आयकर विभागाला द्या. याबाबत माहिती न दिल्यास तुम्हाला संबंधित प्रॉपर्टीबाबत विचारणा केली जाऊ शकते. योग्य माहिती न मिळाल्यास आयकर विभाग तुमच्यावर तडक कारवाईच्या दृष्टीने नोटीस पाठवू शकते.

शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बाँड्स खरेदी

जर तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात रोख व्यवहार करत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगायची गरज आहे. कारण, जर तुम्ही एका आर्थिक वर्षात अशा व्यवहारांसाठी जास्तीत जास्त १० लाख रुपये रोख खर्च करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. (Income Tax Rules) त्यामुळे शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स किंवा बॉंड्समध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरायची नाही हे लक्षात घ्या. अन्यथा आयकर विभागाकडून तुमच्यावर कारवाई झाली म्हणून समजाच.

क्रेडिट कार्डचे मोठे बिल

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणार नाही याची काळजी घ्या. कारण तुमच्या कार्डचे बिल १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि ते तुम्ही रोख स्वरूपात भरलात तर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत नेमका काय आहे? याविषयी आयकर विभाग तुम्हाला विचारणा करेल. (Income Tax Rules) याबाबत तुम्ही योग्य ती माहिती देऊ शकला नाहीत तर आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून तुमच्यावर कारवाई शकते.

बँक मुदत ठेव (FD)

मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करताना एका आर्थिक वर्षात एफडीमध्ये १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलात तर याबाबत तुम्हाला आयकर विभागाकडून विचारणा केली जाऊ शकते. याबाबतची योग्य माहिती न दिल्यास कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर बहुतेक पैसे FD मध्ये ऑनलाइन माध्यमातून किंवा चेकद्वारे जमा करा.

बचत खाते ठेव

जर तुमचे खाते खाजगी किंवा सहकारी बँकेत असेल आणि वर्षभरात तुम्ही तुमच्या बचत खात्यात १० लाख वा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केलीत तर, याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला देणे गरजेचे आहे. (Income Tax Rules) याबाबत जर तुम्ही आयकर विभागाला माहिती दिली नाहीत तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते.