Incomplete Sleep : अपूर्ण झोप करते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या काय होतात परिणाम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Incomplete Sleep) निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या सवयी देखील तशा असायला हव्या, असे डॉक्टर नेहमी सांगतात. आता या सवयी नक्की काय असाव्या? याबाबत अनेकदा विविध संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. चांगला आहार, चांगलं राहणीमान, स्वच्छता, व्यायाम या सगळ्यासह माणसाला निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते ती पूर्ण झोप. मात्र, आजकालची बदलती जीवनशैली आपल्या झोपेवर परिणाम करतेय.

दिवसभराची दगदग आणि शारीरिक थकवा तसेच मानसिक अस्थिरता यामुळे झोप पूर्ण होत नाही. अनेकदा कामाने व्यापलेल्या जीवनशैलीमुळे पुरेशी झोप घेता येत नाही. परिणामी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

शारीरिक थकवा (Incomplete Sleep)

जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर साहजिकपणे आपला दुसरा दिवस अत्यंत कंटाळवाणा जातो. मुख्य म्हणजे, अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक थकवा जाणवतो. ज्यामुळे कोणतेही काम करण्याची इच्छा आणि ताकद राहत नाही. या सगळ्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर होतो. यामुळे चिडचिडेपणा देखील वाढू शकतो. तसेच दिवसभर शरीरातील थकवा माणसाला विविध व्याधींचा शिकार बनवू शकतो.

हृदयासाठी हानिकारक

पुरेशी झोप न झाल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Incomplete Sleep) तज्ञ सांगतात की, ५ तासांपेक्षा कमी झोप झाल्यास हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे विविध गंभीर आजार देखील होऊ शकतात. काही निष्कर्षातून असे समोर आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे हृदय रोग तसेच अकाली मृत्यूचा धोका वाढला आहे.

जुनाट आजारांचा धोका

अपुरी झोप, निद्रानाश यामुळे शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. तज्ञ सांगतात की, कमी झोपेमुळे हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित रोग तर होतातच शिवाय जुनाट आजारांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. सामान्यतः कमी झोपेमुळे हृदय रक्तवाहिन्यांचे आरोग्य बिघडते आणि परिणामी जुनाट आजार डोकं वर काढतात. (Incomplete Sleep)