भारतामध्ये इंटरनेटच्या वापरात वाढ ! काय सांगते आकडेवारी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत फोनचा वापर मोठया प्रमाणात होत असून , बर्नस्टीन रिपोर्टनुसार 2023 मध्ये भारतातील लोक हे 1.19 ट्रिलियन तास मोबाईल फोनचा वापरत करत आहेत. हे प्रमाण 2022 च्या तुलनेत 10 % नी वाढले आहे. लोक डेटाचा वापर बेसुमार करताना दिसत आहेत. भारत हा जगात सर्वाधिक स्थानावर पोहचला आहे. नेमका इंटरनेटचा वापर कुठे जास्त होत आहे , याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .

शहरी तसेच ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर

जिओ, एअरटेल आणि वोडाफोनसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्या नेहमी शहरांकडे लक्ष केंद्रित करतात. पण आज शहरापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढला आहे. लहान खेड्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसून आले आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या बाबतीत छोट्या शहराने मेट्रो सिटीला मागे टाकत आहेत. देशातील 50 टक्के गावांमध्ये गेमिंगसाठी इंटरनेटचा वापर केला जातो, तर शहरांमध्ये हे प्रमाण 24 टक्के आहे.

डेटाचा वापर वाढला

भारतात दरमहा डेटा वापर 35 वरून 40 GB पर्यंत वाढला आहे. भारतात सर्वाधिक डेटा ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मसाठी वापरला जात आहे. कारण यावर आयपीएल सारखे कार्यक्रम पाहण्यास मिळतात . त्यामुळे लोकांचे या प्लॅटफॉर्मचे आकर्षण वाढले आहे. तसेच भारतात व्हिडिओ कॉलिंग आणि चॅटिंग अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे 621 दशलक्ष युजर्स असल्याचे दिसून येते . याचसोबत ऑनलाइन शिक्षणासाठी इंटरनेटचे खेड्यामधील प्रमाण फक्त 20 टक्के तर शहरामध्ये 50 टक्के वाढ झाली आहे. भारतात सुमारे 370 दशलक्ष लोक ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटचा वापर करतात. यामध्ये ग्रामीण भागातील 38 टक्के लोकांचा समावेश आहे, त्यामुळे इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे.

वयोगटाच्या आधारावर वापर

ग्रामीण भागातील 15 ते 25 वयोगटातील 82 टक्के तरुण इंटरनेटचा वापर करतात, तर शहरी भागात हे प्रमाण 92 टक्के आहे. ग्रामीण भागातील 15 ते 24 वयोगटातील 15.7 टक्के व्यक्ती मोबाइल फोन वापरत असल्याचे आढळले आहे, जे शहरी भागातील 97 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या इंटरनेटच्या वापरामुळे आगामी काळात टेलिकॉम क्षेत्रातील धोरणे आणि सुविधा आणखी विकसित होताना दिसतील .