Diwali Special Trains : यंदाच्या वर्षीचा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या सणासाठी गावाकडे जाणाऱ्यांची संख्या खूप असते. यावेळी ट्रेनला सुद्धा मोठी गर्दी होते हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे खात्याकडून विशेष ट्रेन्स चे आयोजन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर काही ट्रेन्सच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने नागपूर-पुणे दरम्यान धावणार्या उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी – ०१२०१ नागपूर-पुणे
प्रवाशांना अधिक सोय उपलब्ध करून देण्यासाठी हा विस्तार करण्यात आला आहे. फेर्यांमध्ये वाढ करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये ही गाडी २८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान ४ फेर्या चालविण्यात येणार होत्या. आता ही गाडी २१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ३ अतिरिक्त फेर्यांसह चालविली जाणार आहे. या गाडीच्या एकूण फेर्या आता ७ करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. ०१२०२ पुणे-नागपूर
ही विशेष २९ ऑक्टोबर ते ८ दरम्यान ४ फेर्या चालविण्यात येणार होत्या. आता ही गाडी २२ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ३ अतिरिक्त फेर्यांसह चालविली जाणार आहे. त्यामुळे या गाडीच्या एकूण फेर्यांची संख्या आता ७ झाली आहे. मात्र, या विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये आणि रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही.