India-Pakistan Conflict: ब्लॅकआऊट ते सायबर वॉरपर्यंत, महाराष्ट्र सज्ज ! फडणवीसांची महत्त्वपूर्ण बैठक, 12 निर्णायक आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India-Pakistan Conflict : भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव टोकाला पोहोचला असतानाच, महाराष्ट्र शासन युद्धसदृश्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अलर्ट मोडवर गेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये राज्याच्या पोलिस, नागरी प्रशासन, गुप्तचर यंत्रणा आणि आपत्कालीन यंत्रणा सहभागी होत्या. या बैठकीत राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षितता व संवेदनशीलतेचा आढावा (India-Pakistan Conflict) घेण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांकडून 12 महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले.

फडणवीसांची स्पष्ट भूमिका (India-Pakistan Conflict)

“युद्ध केवळ सीमारेषेवर लढले जात नाही, तर राज्याच्या अंतर्गत व्यवस्थाही सज्ज असल्या पाहिजेत,” असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्लॅकआऊट, सायबर हल्ला, फेक न्यूज, हॉस्पिटल सुरक्षाव्यवस्था, आपत्कालीन निधी अशा अनेक मुद्द्यांवर स्पष्ट आणि थेट सूचनांचा वर्षाव केला.

फडणवीसांचे 12 निर्णायक आदेश

आपत्कालीन निधी तत्काळ – प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आपत्कालीन खरेदीसाठी निधी तत्काळ उपलब्ध करून द्या. महत्वाच्या प्रस्तावांना 1 तासात मंजुरी द्या.

सायबर सेल अलर्ट मोडवर – पाकिस्तानसमर्थक हॅण्डल्सवर नजर ठेवून कारवाई करा. समाजमाध्यमांवर फेक न्यूज व अफवांना वेळीच थांबवा.

सायबर ऑडिट बंधनकारक – वीज आणि इतर पायाभूत सेवांवरील सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेता, सर्व यंत्रणांचे त्वरित सायबर ऑडिट करा.

ब्लॅकआऊट मोहिमेसाठी जनजागृती – महापालिका, गृहनिर्माण संस्था, नागरिक यांच्यासह जनतेत ब्लॅकआऊटविषयी जागरूकता निर्माण करा.

सैन्य व कोस्टगार्डशी समन्वय – पुढील आढावा बैठकीत सैन्यदल, नौदल आणि कोस्टगार्ड अधिकाऱ्यांना VC द्वारे सहभागी करा.

हॉस्पिटल ब्लॅकआऊट प्लॅन – हॉस्पिटलमध्ये पर्यायी वीज व्यवस्था, गडद पडदे व काचा यांचा वापर करून आंतरिक लाईट बाहेर झळकू नये, याची दक्षता घ्या.

ब्लॅकआऊट जनजागृती व्हिडिओ – नागरिक व विद्यार्थ्यांसाठी “ब्लॅकआऊट म्हणजे काय?” याचे शैक्षणिक व्हिडिओ तयार करा व सोशल मीडियावर प्रसारित करा.

युनियन वॉर बुकचे प्रशिक्षण – केंद्र सरकारच्या ‘Union War Book’ चा अभ्यास करून सर्व संबंधित यंत्रणांना त्याचे प्रशिक्षण द्या.

झोपडपट्टी व संकुलांमध्ये संपर्क केंद्र – अत्यावश्यक ठिकाणी कंट्रोल रूम व अलर्ट सिस्टम तयार करा.

रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट अलर्ट – महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन व बस स्थानकांवर पोलिस बंदोबस्त आणि स्निफर डॉग युनिट तैनात करा.

प्रतिक्रिया दल तयार – प्रत्येक जिल्ह्यात त्वरित कृती पथक (QRT) सज्ज ठेवा.

सामाजिक शांततेसाठी संवाद – अफवांपासून सामाजिक तणाव वाढू नये म्हणून धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत सतत संवाद साधा.

‘सामान्य जनतेचा सहभागही महत्त्वाचा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही कोणतीही घबराट निर्माण करणारी कारवाई नाही, तर सजगतेसाठीचा प्रयत्न आहे. जनतेनेही शासनाच्या सूचनांचे पालन करावे. अफवांपासून दूर राहावे.”

सोशल मीडियावर जनजागृती मोहीम सुरू!

राज्य सरकार लवकरच ‘ब्लॅकआऊट प्रोटोकॉल’, ‘सायबर सावधानता’, आणि ‘आपत्कालीन संपर्क’ यावर आधारित WhatsApp ब्रॉडकास्ट व सोशल मीडिया मोहीम सुरू करणार असल्याची शक्यता आहे.