भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले तर कोणते भाग होणार उद्ध्वस्त? कोणत्या भागांवर होणार नाही परिणाम?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Pakistan Nuclear War : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बेजबाबदार वर्तणुकीचे दर्शन घडले आहे. नुकतेच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बास यांनी भारताला थेट अणुहल्ल्याची धमकी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने ‘शाहीन’ सारख्या क्षेपणास्त्रांची सजावट करण्यासाठी नव्हे तर भारतावर हल्ला करण्यासाठीच (India Pakistan Nuclear War) ती शस्त्रे बनवली आहेत.

अणुहल्ला झाला तर काय होईल? (India Pakistan Nuclear War)

भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणाव वाढत असताना सामान्य नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब फेकला तर काय होईल, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. परंतु, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतदेखील पाकिस्तानच्या किमान १० प्रमुख शहरांचा नाश करण्याची क्षमता ठेवतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पूर्वीपासूनच तणावपूर्ण आहेत, विशेषतः काश्मीर प्रश्न, सीमावाद आणि दहशतवादामुळे.

भारतातील कोणते भाग असतील धोक्यात? (India Pakistan Nuclear War)

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पाकिस्तानच्या अणुहल्ल्याच्या टप्प्यात भारतातील काही महत्वाचे शहरे येऊ शकतात. विशेषतः मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरु यावर मोठा धोका आहे. मुंबई आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची असून जगातील सर्वाधिक घनदाट वस्ती असलेले शहर आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे आणि बेंगळुरु देशाच्या तांत्रिक व संरक्षणदृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक आहे.

पाकिस्तानातील कोणते भाग होतील लक्ष्य? (India Pakistan Nuclear War)

भारताकडून पाकिस्तानच्या इस्लामाबाद, लाहोर, कराची, फैसलाबाद, पेशावर, मुल्तान, गुजरांवाला, रावळपिंडी, हैदराबाद आणि क्वेटा या शहरांवर प्रत्युत्तरात्मक अणुहल्ला केला जाऊ शकतो. अशा हल्ल्यांमुळे केवळ शहरे नष्ट होणार नाहीत, तर रेडिएशनमुळे आरोग्यसंकट, अन्नधान्याचा तुटवडा आणि सामाजिक अराजकता पसरू शकते. हिरोशिमा आणि नागासाकीच्या ऐतिहासिक उदाहरणांवरून असे परिणाम किती भयानक असू शकतात, याचा अंदाज बांधता येतो.