India Pakistan War : पाहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांवर थेट प्रहार करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या प्रतिउत्तराने पाकिस्तानला हादरवून टाकले आहे. परिणामी, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 7 मे रोजी संसदेत उघडपणे भारताविरुद्ध युद्धाची भाषा केली. त्यांनी “रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल,” अशी धमकी देत पाकिस्तानच्या (PakThreat) सैन्याला ‘पूर्ण मोकळीक’ दिली आहे. या पार्श्वभूमीवर, भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली आहे. पण अशा परिस्थितीत देशातील कोणत्या राज्यांना आणि शहरांना प्रथम आणि सर्वाधिक धोका असेल? मुंबई, पुण्यासारखी शहरे कितपत सुरक्षित आहेत? (India Pakistan War) चला जाणून घेऊया…
सीमावर्ती राज्ये सर्वाधिक धोक्यात
भारत-पाकिस्तान दरम्यान थेट भूसीमा असलेली राज्ये म्हणजे जम्मू आणि काश्मीर,पंजाब,राजस्थान, गुजरात या सीमावर्ती राज्यांमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला असून येथील सुरक्षा सिस्टीम अतिशय सतर्क करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर ज्या भागात हल्ला होण्याची शक्यता आहे अशा भागांत रात्रीच्या वेळी ‘ब्लॅकआउट’ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा : मुंबईत ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात
या राज्यांमध्ये सैन्य तळ, हवाई तळ, रडार यंत्रणा आणि नागरिकवस्ती असलेल्या सीमाजवळील भागांवर थेट हल्ला (India Pakistan War) होण्याची शक्यता अधिक आहे. विशेषतः जम्मू-राजोरी, पठाणकोट, श्रीगंगानगर, जैसलमेर, भुज, गांधीधाम या भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.
महाराष्ट्र तुलनात्मकदृष्ट्या सुरक्षित, पण…
महाराष्ट्राची पाकिस्तानशी थेट सीमा नसल्याने युद्धजन्य परिस्थितीत थेट हल्ला होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, मुंबई आणि पुणे यांसारख्या महत्त्वाच्या आर्थिक आणि औद्योगिक शहरांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हवाई हल्ल्याची शक्यता लक्षात घेतली तर पाकिस्तानकडून थेट हवाई हल्ला करण्यासाठी लागणारी फायरपॉवर आणि रडार-चुकवणारी क्षमता सध्या मर्यादित आहे. दुसरीकडे समुद्री मार्गाचा धोका किती ? असा प्रश्न आला तर पाकिस्तानचा आणि महाराष्ट्राचा संपर्क फक्त अरबी समुद्रमार्गेच होऊ शकतो. परंतु भारतीय नौदल हीच या समुद्राची खरी शक्ती आहे. INS विक्रांत, स्कॉर्पीन श्रेणीची सबमरीन, आणि कोस्टल रडार सिस्टम यामुळे मुंबईसारखी शहरं तुलनात्मकदृष्ट्या अधिक सुरक्षित आहेत.
भारतीय संरक्षण व्यवस्था (India Pakistan War)
भारतानं आपली सुरक्षा कवचं आणखी मजबूत केली आहेत. भारताच्या सुरक्षा प्रणाली मध्ये अत्याधुनिक मशिन्स आणि शस्त्रांचा समावेश आहे. जो लांबूनच हल्ले होणारी क्षेपणास्त्रे ओळखतो आणि हवेतच त्यांना नष्ट करतो.
S-400 डिफेन्स सिस्टम – 400 किमी अंतरावरून क्षेपणास्त्र टिपू शकणारी यंत्रणा
RAFALE, SU-30MKI फायटर जेट्स – हवाई हमल्यांना प्रत्युत्तर देणारी आघाडीची यंत्रणा
DRDO-developed आकाश, ब्रम्होस मिसाइल्स – जल, नभ आणि स्थलातून प्रत्युत्तराची ताकद
जे राज्य पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे त्यांना सजग राहणं गरजेचं आहे. मुंबई,(MumbaiSafety) पुणे (PuneSecurity) यांसारखी शहरे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असली, तरी संरक्षण यंत्रणा पूर्ण सज्ज असल्याने त्या तुलनेत सुरक्षित आहेत.भारतीय नागरिकांनी अफवांपासून दूर राहावं, आणि अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा.
आता पुढे काय?
- सरकारकडून सतत परिस्थितीचं परीक्षण
- सीमांवरील लष्करी हालचालींवर नजर
- पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय, आणि एनएसए सतत संपर्कात




