‘तू शेर-ए-हिंद आगे बढ़…’ भारतीय लष्कराने POK मधील दहशतवादी तळ उडवले; पाहा VIDEO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Pakistan War : भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. ७ मेच्या रात्रीपासून भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मध्ये जोरदार हवाई हल्ले चढवत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांचे तळ जमीनदोस्त केले आहेत. यानंतर आता सीमेलगत असलेल्या आतंकी लॉन्चपॅड्सवरही भारतीय लष्कराने जोरदार तोफगोळ्यांसह निशाणा साधला आहे.

भारतीय जवानांचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय लष्कराने धडक कारवाई करतानाचा एक अधिकृत व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘कदम-कदम बढ़ाए जा…’ हे देशभक्तिपर गीत बॅकग्राऊंडला वाजत आहे, तर भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये (POK) सर्जिकल स्ट्राइकसदृश हल्ला करत दहशतवादी तळ उडवत आहेत.

पाक ड्रोन हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर

भारतीय लष्कराच्या निवेदनानुसार, ८ आणि ९ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्न झाले. या दुस्साहसाला चोख प्रत्युत्तर देताना भारताने POK मधील अनेक लाँचपॅड्सवर समन्वयित हल्ला चढवला. हे लॉन्चपॅड्स अनेकदा भारतातील नागरी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ल्यांसाठी वापरले जात होते.

व्हिडीओमध्ये वंशीधर शुक्ला लिखित आणि राम सिंह ठकुरी संगीतबद्ध ‘कदम-कदम बढ़ाए जा…’ हे आजाद हिंद फौजेसाठीचे प्रसिद्ध गीत वाजताना दिसते. हे गाणे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी देशद्रोही ठरवत बंदी घातली होती, परंतु १९४७ नंतर ते भारतात पुन्हा सुरू करण्यात आले आणि आजही हे गीत देशभक्तीचा प्रतीक आहे.

पाकड्यांचा घमंड चाकणाचूर ! दिल्लीवर फतेह-II क्षेपणास्त्राचा हल्ला; भारताने हवेतच केला नायनाट

७ दहशतवादी ठार

या कारवाईपूर्वी जम्मू-कश्मीरमधील सांबा भागात बीएसएफने (BSF) दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला होता. लष्कर-ए-तैयबाचे ७ दहशतवादी यामध्ये ठार झाले होते.

शनिवारी सकाळी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी यांनी ही माहिती दिली. यावेळी एक व्हिडीओही दाखवण्यात आला ज्यामध्ये भारतीय जवान POK मधील दहशतवादी तळांवर अचूक निशाणा साधताना दिसतात. धुराचे लोळ उठताना, पाकिस्तानी चौक्यांचे विस्फोट होतानाचे दृश्य पाहायला मिळते.