India Pakistan War : घुसखोरीचा फडशा ! भारताकडून पाकचे 4 एअरबेस आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Pakistan War : जम्मूजवळ पाकिस्तानी घुसखोरी आणि ड्रोन हल्ल्यांचा चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्यांचा, दहशतवादी लॉन्च पॅड्सचा आणि महत्त्वाच्या एअरबेसचा नायनाट केला आहे. या कारवाईमध्ये पाकिस्तानमधील किमान चार एअरबेस लक्ष्य करण्यात आले असल्याची माहिती संरक्षण स्रोतांकडून मिळाली आहे.

भारतीय हल्ल्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे ट्यूब लॉन्च ड्रोनच्या माध्यमातून भारतात घुसखोरी करणाऱ्या (India Pakistan War) तळांवर अचूक प्रहार करणे. सध्या श्रीनगर आणि आजूबाजूच्या भागांमध्येही पाकिस्तानशी जोरदार चकमक सुरू आहे. त्यात भारतीय लष्कराने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली (SAM) सज्ज ठेवली आहे.

पाकिस्तानने भारतातील २६ शहरांवर ड्रोन हल्ले

या प्रत्युत्तराची पार्श्वभूमी अशी आहे की, गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री सलग दोन दिवस पाकिस्तानने जम्मू-कश्मीरपासून गुजरातपर्यंत भारतातील तब्बल २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. त्यानंतर भारतीय लष्कराने कठोर कारवाई करत सीमारेषेवर पाकिस्तानच्या चौक्यांवर आणि दहशतवादी तळांवर अचूक लक्ष्य केले.

ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर परिस्थितीत वाढला तणाव

२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील काश्मीरमधील (PoK) लॉन्च पॅड्सवर टार्गेटेड हल्ला केला होता. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आले आहे. या ऑपरेशननंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कमालीचा वाढला आहे.

भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम नष्ट झाली? लष्कराने दिली मोठी माहिती

पाकिस्तानने एअरबेसवर झालेल्या हल्ल्याचं मान्य केलं

पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी शनिवारी पहाटे ४ वाजता इस्लामाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय हल्ल्याची कबुली दिली. त्यांनी म्हटलं की, रावलपिंडीतील नूर खान एअरबेस, चकवालमधील मुरीद एअरबेस आणि झांग जिल्ह्यातील रफीकी एअरबेस हे भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोन हल्ल्यांनी लक्ष्य केले गेले. भारताकडूनही काही वेळानंतर अधिकृत सूत्रांनी या कारवाईची पुष्टी केली.

रोखला पाकिस्तानच्या 8 क्षेपणास्त्रांचा मारा (India Pakistan War)

संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, जम्मूमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या एअरबेससह इतर ठिकाणांच्या दिशेने पाकिस्तानकडून दागण्यात आलेल्या किमान आठ क्षेपणास्त्रांचा भारताने यशस्वीपणे प्रतिकार केला. हवाई सुरक्षा यंत्रणांनी या सर्व हल्ल्यांना यशस्वीपणे परतवून लावले आहे.

हायलाइट्स

  • पाक चौक्या, लॉन्च पॅड्स, ४ एअरबेस उध्वस्त
  • ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रतिउत्तर
  • २६ भारतीय शहरांवर ड्रोन हल्ल्यांनंतर कारवाई
  • पाकिस्तानने स्वतः मान्य केलं नुकसान
  • भारतीय SAM यंत्रणा सज्ज