ऑपरेशन सिंदूरनंतर युद्धसदृश परिस्थिती? भारताच्या ‘या’ राज्यांवर जास्तीत जास्त धोका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

India Pakistan War : पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे थरकाप उडाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. जर युद्धाचा धोका प्रत्यक्षात उतरला, तर भारतात काही राज्ये सर्वाधिक धोक्याच्या झोनमध्ये असतील. सीमावर्ती भागात सध्या उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूर (India Pakistan War)

भारतीय वायूदलाने ७ मेच्या मध्यरात्री “ऑपरेशन सिंदूर” राबवून पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. या कारवाईत मसूद अजहरच्या कुटुंबातील सदस्यांसह अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून २०२२ च्या पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेतल्याचं मानलं जातंय.

या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती घोषित करत पूर्णपणे मुभा देण्यात आले आहेत. त्यामुळे युद्धजन्य स्थिती अधिकच गडद होत चालली आहे. भारतानेही सर्व सीमेवर सतर्कतेचा इशारा दिला असून संरक्षण यंत्रणा उच्च अलर्टवर आहेत.

‘या’ राज्यांमध्ये जास्त धोका (India Pakistan War)

जर भारत-पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष युद्ध झालं, तर पुढील पाच राज्यांवर सर्वाधिक धोका असेल, कारण यांची सीमा पाकिस्तानशी थेट जोडलेली आहे:

जम्मू आणि काश्मीर

  • LoC (लाइन ऑफ कंट्रोल) ची एकूण लांबी ७४० किमी.
  • पाकव्याप्त काश्मीरशी थेट सीमारेषा.
  • येथे सतत घुसखोरी आणि गोळीबाराचे प्रकार. लडाख
  • कारगिल आणि द्रास सेक्टर – पाकिस्तानशी लागून.
  • चीनच्या सीमेलाही लागून असल्याने दुहेरी धोका.
  • १९९९ चे कारगिल युद्ध याच भागात झाले होते.
  • पंजाब
  • पाकिस्तानशी ५५३ किमी लांब आंतरराष्ट्रीय सीमा (IB).
  • पठानकोट, गुरदासपूर, अमृतसर, तरनतारण, फाजिल्का यांसारखे संवेदनशील जिल्हे.
  • घुसखोरी, दहशतवाद व ड्रग्ज तस्करीचा कायम धोका.
  • राजस्थान
  • १,०७० किमी लांब IB पाकिस्तानच्या सिंध प्रांताशी जोडलेली.
  • श्रीगंगानगर, बीकानेर, जैसलमेर, बाडमेर हे जिल्हे सरहदी.
  • वाळवंटामुळे लष्करी हालचालींना अडथळा, पण धोका कायम.
  • गुजरात
  • ५१२ किमी लांब सीमा, विशेषतः कच्छ आणि सर क्रीक परिसर संवेदनशील.
  • भुज, लाखपत, नरकोट यांसारखे रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचे भाग.

केंद्र सरकारची पावलं (India Pakistan War)

गृह मंत्री अमित शहा यांनी ७ मे रोजीच सीमेवरील सतर्कता वाढवण्याचे आदेश दिले आहेत. BSF, ITBP, सेना आणि हवाई दल पूर्ण तयारीत आहेत. संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सेना सज्ज (India Pakistan War)

भारतीय सेना २४x७ सीमेवर सज्ज आहे. कोणतीही अनिष्ट घटना घडू नये यासाठी सर्वच पातळ्यांवर जबरदस्त उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.