Indian Overseas Bank : ‘या’ सरकारी बँकेचे कर्ज महागले; ग्राहकांना भरावा लागणार जादा EMI

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indian Overseas Bank) आजच्या काळात एखादे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तर हातात पैसा लागतो. अशातच वाढती महागाई सर्व सामान्यांना पिळवटून काढते आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग महिन्याच्या अखेरीस हातात किती पैसे राहतात ते पाहून स्वप्नपूर्तीचा विचार करतात. अशा स्वप्नपूर्तीसाठी सरकारी बँकांमधून मिळणारे कर्ज हे आर्थिकस्वरूपातील विशेष सहाय्य ठरते. दरम्यान, सरकारी बँकांपैकी एक इंडियन ओव्हरसीजच्या ग्राहकांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. या बँकेतून कर्ज घेणे आता महाग पडणार असल्याचे समोर आले आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

इंडियन ओव्हरसीज बँकेतून कर्ज घेणे महागणार (Indian Overseas Bank)

सरकारी बँक इंडियन ओव्हरसीजने नुकतेच मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट अर्थात MCLR मध्ये वाढ केल्याचे जाहीरपाने सांगितले आहे. त्यामुळे आता इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कर्जधारकांना लोनवर पूर्वीपेक्षा काही प्रमाणात अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचे समजत आहे. एका वृत्तानुसार, इंडियन ओव्हरसीज बँकेने आताच्या घडीला MCLR मध्ये ०.०५ टक्के ते ०.१० टक्क्यांनी वाढ केल्याचे समजत आहे. MCLR म्हणजे काय? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर त्याविषयी देखील जाणून घेऊया.

MCLR म्हणजे काय?

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट. अर्थात निधी आधारित कर्ज दाराची सीमांत किंमत. (Indian Overseas Bank) MCLR प्रणाली हा असा किमान दर आहे ज्याच्याखाली कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा की, या दरापेक्षा कमी दरात बँक ग्राहकांना कोणत्याही स्वरूपाचे कर्ज देऊ शकत नाहीत आणि हा दर जितका वाढेल तितके कर्जावरील व्याज वाढत जाईल. प्रत्येक बँकेला त्यांचा MCLR दर हा महिन्याला जाहीर करणे बंधनकारक असे.

इंडियन ओव्हरसीज बँकेचा MCLR दर

इंडियन ओव्हरसीज बँकेचा (Indian Overseas Bank) MCLR दर हा रात्रभर ८ टक्के होता जो आता वाढून ८.०५ टक्के इतका झाला आहे. तर १ महिन्याचा MCLR पूर्वी ८.२० टक्के होता. जो ५ बेस पॉईंट्स वाढल्याने आता ८. २५ टक्के इतका झाला आहे. पूर्वी ३ महिन्यांसाठी ८.४० टक्के असलेला MCLR दर आता ८.४५ टक्के इतका झाला आहे.

तसेच ६ महिन्यांचा MCLR पूर्वी ८.६५ टक्के होता. जो आता ८. ७० टक्के झाला आहे. तर १ वर्षाचा MCLR दर पूर्वी ८.८० टक्के होता. जो आता ८.८५ टक्के इतका झाला आहे आणि २ वर्षांचा MCLR दर पूर्वी ८.८० टक्के होता. जो आता ८.८५ टक्के झाला असून ३ वर्षांचा MCLR दर पूर्वी ८.८५ टक्के इतका होता. (Indian Overseas Bank) यामध्ये १० बेसिस पॉईंट वाढल्याने तो आता ८.९५ टक्के झाला आहे.

MCLR दर वाढल्याचे परिणाम

इंडियन ओव्हरसीज बँकेचा MCLR दर वाढल्याने साहजिकपणे या बँकेतून घेतले जाणारे गृहकर्ज, वाहन कर्ज यांसारख्या किरकोळ किमतीशी संबंधित कर्जावरील व्याजदर वाढतील. मात्र एक महत्वाची गोष्ट अशी की, जेव्हा MCLR दर वाढतो तेव्हा कर्जावरील व्याजदर लगेच वाढत नाहीत. कर्जदारांचे फक्त EMI रिसेट तारखेला वाढते. (Indian Overseas Bank)