Indian Railway : मध्य रेल्वेचा तब्बल 10 दिवस मेगाब्लॉक ; पहा कोणत्या गाड्या होणार रद्द ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये रेल्वे कडून ब्लॉक घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे -मुंबई दरम्यान दौंड जवळ काम असल्यामुळे ब्लॉक घेण्यात आला होता. शिवाय त्यानंतर सोलापूर मार्गावरील सुद्धा काही गाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकणी पावसामुळे सुद्धा रेल्वे वाहतुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम (Indian Railway) झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून येत्या 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ केंद्रातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे या ब्लॉक (Indian Railway) दरम्यान नागपूर -भुसावळ मार्गावरील तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

म्हणून घेतला जातोय मेगाब्लॉक (Indian Railway)

सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘यार्ड रिमोडूलिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य यादरम्यान केले जाणार आहे. तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा-नागपुर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येत आहे. त्याचे कामही (Indian Railway) या विशेष ब्लॉक दरम्यान केले जाणार आहे.

कोणत्या गाड्या होणार रद्द ? (Indian Railway)

  • गाडी क्रमांक 12119 अमरावती -अजनी एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 12120 अजनी -अमरावती एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असेल.
  • गाडी क्रमांक 12159 अमरावती -जबलपूर एक्सप्रेस 04, 05, 09, 10 ऑगस्ट रोजी रद्द केली.
  • गाडी क्रमांक 12160 जबलपूर -अमरावती एक्सप्रेस 05, 06, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असणार आहे.
  • गाडी क्रमांक 22124 अजनी -पुणे हमसफर एक्सप्रेस 6 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22117 पुणे -अमरावती एक्सप्रेस 7 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22141 पुणे -नागपुर हमसफर 08 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22118 अमरावती -पुणे एक्सप्रेस 08 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22142 नागपुर – पुणे हमसफर एक्सप्रेस 9 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22139 पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस 10 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22140 अजनी – पुणे हमसफर एक्सप्रेसची 11 ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात येणार आहे.
  • गाडी क्रमांक 12140 नागपुर – मुंबई एक्सप्रेस 5 ऑगस्ट रोजी नागपूर विभागात 01.45 तास नियमित केली जाईल

अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली. दरम्यान (Indian Railway) या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.