Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे, याबाबतचे नियोजन रेल्वे विभागाकडून केले जात असून रेल्वे येत्या दोन आर्थिक वर्षात 10,000 बिगर वातानुकूलित डबे तयार करणार आहे. त्यामुळे जनरल डब्यातून सुद्धा धक्का बुक्की न होता आरामदायी (Indian Railway) प्रवास करता येणार आहे.

मंगळवारी एका निवेदनात ही माहिती देताना उत्तर रेल्वेने सांगितले की, या उपक्रमाचा उद्देश सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा वाढवणे हा आहे. पुढील दोन वर्षांत 10,000 बिगर वातानुकूलित डबे तयार झाल्यानंतर एकूण प्रवासी (Indian Railway) डब्यांमध्ये त्यांचा वाटा 22 टक्क्यांनी वाढेल.

कोचचे केले जाणार वर्गीकरण (Indian Railway)

2024-25 या आर्थिक वर्षात, रेल्वे 32 पार्सल व्हॅन आणि 55 पॅन्ट्री कारसह सामान्य श्रेणीचे 2,605 डबे, स्लीपर क्लासचे 1,470 डबे आणि SLR (गार्ड आणि अपंगांसाठी राखीव) श्रेणीचे 323 डबे तयार करणार आहेत. निवेदनानुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या अमृत भारत कार्यक्रमांतर्गत गाड्यांसाठी जनरल, स्लीपर आणि एसएलआर कोचचाही (Indian Railway) समावेश आहे.

त्याचप्रमाणे 2025-26 या आर्थिक वर्षात 2,710 सामान्य श्रेणीचे डबे, 1,910 स्लीपर क्लास कोच, 514 SLR डबे, 200 पार्सल व्हॅन आणि 110 पँट्री कार तयार करण्यात येणार आहेत. निवेदनानुसार, “विनावातानुकूलित डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेशा आणि चांगल्या सुविधा सुनिश्चित करणे आणि प्रवाशांच्या बदलत्या गरजा आणि हंगामी चढउतारांच्या अनुषंगाने आराम आणि उपलब्धता वाढवणे (Indian Railway) हे रेल्वेचे लक्ष आहे.”

नवीन रेल्वे डब्यांच्या बांधणीमुळे, रेल्वे मोठ्या संख्येने प्रवाशांना कन्फर्म तिकीट प्रदान करण्याच्या स्थितीत असेल. त्यामुळे प्रवाशांना दीर्घ प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागणार नाही. विशेषत: सण आणि सुट्टीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळणे अवघड होऊन बसते (Indian Railway) तसे होणार नाही. ट्रेनमध्ये जनरल आणि स्लीपर क्लासच्या डब्यांची संख्या कमी असल्यानेही समस्या वाढत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी आणि सोयीस्कर प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने बिगर वातानुकूलित श्रेणीचे डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.