Indian Railway : भारतीय रेल्वे ही जगातील चौथी सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था आहे. रेल्वेचे जाळे भारतातील दुर्गम भागात पसरलेले आहे. भारतात अनेकदा एखाद्याला लांबचा प्रवास करावा लागतो. तेव्हा लोकांची पहिली पसंती रेल्वेला असते. याशिवाय आता केवळ सध्या ट्रेन नाही तर वंदे भारत सारख्या आरामदायी आणि प्रवासाचा सुखद अनुभव देणाऱ्या ट्रेन्स सुद्धा प्रवाशांच्या चांगल्याच पसंतीस (Indian Railway) उतरत आहेत. रेल्वे स्टेनवर आल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आकर्षून घेते ती रेल्वेचे उद्घोषणा या उद्घोषणांबद्दल आता अपडेट आली आहे.
ट्रेनची घोषणा आता 14 भाषांत (Indian Railway)
रेल्वे प्रवास आरामदायी आणि सुविधांनी परिपूर्ण आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभ उत्सवाला सुरुवात झाली आहे. या महाकुंभात भाविकांना चांगली सेवा देण्यासाठी भारतीय रेल्वे विशेषत: अनेक गाड्या चालवत आहे.त्यामुळे आता आणखी एक नवीन सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेनेही ट्रेनच्या घोषणेच्या पद्धतीत बदल केला आहे. आता ट्रेनची घोषणा एक-दोन नव्हे तर 14 भाषांमध्ये होणार आहे. ज्याची सुरुवात प्रयागराजच्या रेल्वे स्थानकांवरून (Indian Railway) झाली आहे.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या या महाकुंभासाठी केवळ भारतातूनच नव्हे तर देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत बिगर हिंदी भाषिक भागातूनही अनेक भाविक येतील. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन रेल्वेने बहुभाषिक घोषणांची व्यवस्था केली आहे.
या भाषांचा समावेश (Indian Railway)
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त एकूण 14 भाषांमध्ये घोषणा दिल्या जातील. या भाषांमध्ये इतर 12 भाषा आहेत. ज्यामध्ये संस्कृत, मैथिली गुजराती, मराठी, तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड, बंगाली, आसामी, ओरिया आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.
बहुभाषिक घोषणांची ही प्रणाली प्रयागराज जंक्शन, प्रयागराज शिवकी, प्रयाग जंक्शन, प्रयागराज रामबाग या रेल्वे स्थानकांवर (Indian Railway) लागू करण्यात आली आहे. कुंभनगरी प्रयागराजमध्ये येणाऱ्या भाविकांना आता त्यांच्या प्रादेशिक भाषेत माहिती मिळू शकणार आहे. भारतीय रेल्वेने कुंभला येणाऱ्या भाविकांसाठी निवाऱ्याची व्यवस्थाही केली आहे आणि त्याशिवाय रंगीत तिकिटे देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना निवाऱ्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल. ट्रेन, प्लॅटफॉर्म आणि कुंभ.