Indian Railway : जेष्ठ नागरिकांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर ; लागू केला नवा नियम, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारतीय रेल्वेने दररोज लाखो आणि करोडो लोक प्रवास करतात. मग तिथे लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही येतात. अशा परिस्थितीत, रेल्वे प्रत्येकाची काळजी घेते, मग तुम्ही एकटे प्रवास करत असाल किंवा गरोदर पत्नीसोबत, तुमच्या प्रवासात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही याची रेल्वे काळजी घेते. जर तुम्ही वयोवृद्ध श्रेणीत येत असाल तर ही बातमी (Indian Railway) तुमच्यासाठीच आहे.

जेष्ठ नागरिकांना ट्रेन मधील अपर बर्थला जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच रेल्वेने एक नियम जारी केला असून रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोअर बर्थ आरक्षित करण्यात आला (Indian Railway) आहे.

IRCTC ने याबाबत काम सुरु केले असून IRCTC च्या वेबसाइटवरून आता तुम्हाला तुमच्या घरातील जेष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ आरक्षित करता येणार आहे. आजच्या लेखात आपण या सेवेचा लाभ कसा घेणार आहोत ? IRCTC च्या वेबसाइटवरून जेष्ठ नागरिकांसाठी ऑनलाईन बुकिंग कसे करावे ? जाणून घेऊया ….

काय आहेत नियम ? (Indian Railway)

  • सगळ्यात आधी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करावे लागेल. त्यासाठी सामान्य कोटा मधून तिकीट बुक करा.
  • त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लोअर बर्थ अलॉट केले आहेत त्यानंतर जर सीट असेल तरच तुम्हाला लोअर बर्थ सीट मिळेल
  • जर तुम्ही आरक्षित मधून तिकीट बुक केले असेल तर तिथे लोवर बर्थ अलॉट केलेले असेल तरच तुम्हाला ती सीट मिळणार आहे.
  • जो व्यक्ती सर्वप्रथम तिकीट बुक करेल त्याला प्राधान्य दिले जाईल त्यानंतरच तुम्हाला सीट मिळेल.