Indian Railway : काय सांगता ! भारतातल्या ‘या’ राज्यात पहिल्यांदाच धावणार रेल्वे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : तसे पहायला गेले तर भारतात रेल्वे सर्वप्रथम ब्रिटिशांच्या काळात आली. व्यापार आणि स्थलांतर हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. बघता बघता देशभरात रेल्वेचे मोठे जाळे विकसित झाले. भारतात क्वचितच (Indian Railway) अशा भाग दिसेल जिथे रेल्वे पोहचली नाही. परंतु प्रत्यक्षात खरंच असा एक भाग आहे जिथे अजून रेल्वे पोहचली नाही. हो …! तुम्हाला वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भारतात असे कोणते ठिकाण आहे ? चला जाणून घेऊया..

अद्याप रेल्वे पोहचली नसलेले भारतातील (Indian Railway) राज्य म्हणजे सिक्कीम. सिक्कीम हे राज्य निसर्ग सौन्दर्याने नटलेले आहे. सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 रोजी भारताचा भाग बनले. राजेशाही संपल्यानंतर देशातील 22 वे राज्य बनले. मात्र अदयाप या भागात रेल्वे पोहचली नव्हती. याचे प्रमुख कारण म्हणजे तेथील डोंगराळ भाग. डोंगराळ भाग असल्यामुळे तिथे रेल्वे रूळ बांधणे बोगदे बंधने तितकेच आव्हानात्मक आहे. मात्र सिक्कीमला जाणाऱ्या लोकांना लवकरच रेल्वेने येथे येता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल (२७) येथे राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायभरणी केली आहे.

आता सरकारने सिक्कीम मध्ये तीन टप्प्यांत येथे रेल्वे आणण्याची तयारी सुरू (Indian Railway) केली आहे. पहिल्या टप्प्यात सेवोक ते रंगपो रेल्वे प्रकल्प होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रांगपो ते गंगटोक आणि तिसऱ्या टप्प्यात गंगटोक ते नाथुला हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. या मार्गावर एकूण पाच रेल्वे स्थानके असणार आहेत. ज्यामध्ये तीस्ता बाजार देखील असेल. तीस्ता बाजार हे भारतातील पहिले भूमिगत हॉल्ट स्टेशन असू शकते. या मार्गावरील उर्वरित चार ओपन क्रॉसिंग स्टेशन शिवोक, रेआंग, मेल्ली आणि रंगपो असतील.

ऑक्टोबर 2009 मध्ये शिवोक-रंगपो रेल्वे प्रकल्प सुरु झाला होता. आता येथे सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन बांधले (Indian Railway) जाणार आहे. या रेल्वे लाईन प्रकल्पाची लांबी सुमारे 45 किमी आहे जी पश्चिम बंगालमधील शिवोक ते सिक्कीममधील रंगपोला जोडते.