Indian railway Routes : ‘हे’ आहेत भारतातील सर्वात सुंदर रेल्वे ट्रॅक ; ज्याची बॉलीवूडवाल्यांनाही भुरळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian railway Routes : भारत जगभरात त्याच्या संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. पण भारताचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतातील निसर्ग सौन्दर्य… काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यन्त भारत निसर्ग संपन्नतेने नटलेला आहे. भारताचे हेच सौन्दर्य पाहण्यासाठी अनेक टुरिस्ट येथे भेटी देत असतात. भारतातल्या या निसर्ग संपन्न ठिकणांना भेट देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र ट्रेन हे त्यापैकी एक सर्वात प्रभावी माध्यम म्हणावे लागेल. कारण भारतात रेल्वेचे सर्वात मोठे नेटवर्क आहे जे नेटवर्क भारताला जोडून ठेवते.

देशभरातील लोकांना जोडणारी ही रेल्वे निसर्ग सौंदर्यातही मागे नाही. येथे अनेक रेल्वे ट्रॅक (Indian railway Routes )आहेत, जे सुंदर ठिकाणांहून जातात. आज या लेखात आपण अशाच काही सुंदर रेल्वे मार्गांबद्दल जाणून घेणार आहोत

कोकण रेल्वे(Indian railway Routes)

कोकण रेल्वेने प्रवास करताना तुम्ही अद्भुत निसर्ग सौन्दर्याचा अनुभव घेऊ शकता. मुंबई ते गोवा या मार्गावर तुम्हाला सुंदर आणि प्रेक्षणीय पर्वत रांगा, अनेक आकर्षक वळणे, नदीचे पूल, तलाव आणि धबधबे पाहायला मिळतील. यापैकी दूधसागर भाबधबा खूप प्रसिद्ध असून चित्रपटांमध्ये देखील याचे चित्रीकरण (Indian railway Routes ) करण्यात आले आहे.

दार्जिलिंग रेल्वे

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेल्या या नॅरोगेज रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करणे म्हणजे एक सुंदर अनुभव आहे. हा अनुभव घेण्यासाठी जगातील विविध भागातून लोक (Indian railway Routes ) दार्जिलिंगमध्ये येतात. ही टॉय ट्रेन सुंदर पर्वतांमधून जाते, जिथून कांचनजंगा पर्वताचे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळते.

हिमालयन क्वीन

सुंदर पर्वतरांगाच्या मधून वाट काढत जाणारी ही ट्रेन तुम्हाला (Indian railway Routes ) रोमांचकारी अनुभव देईल यात शंका नाही. प्रवासाला सुमारे पाच तास लागतात आणि 20 रेल्वे स्थानके, 800 पूल, 103 बोगदे आणि 900 वळणांवरून शिमल्यापर्यंत पोहोचते. जी एक चांगला अनुभव देईल.

कांगडा व्हॅली रेल्वे (Indian railway Routes )

कांगडा व्हॅली रेल्वे भारतातील सर्वोत्तम रेल्वेप्रवासापैकी एक आहे. या मार्गावरून प्रवास केल्याने तुम्हाला धौलाधर पर्वतरंगांचे सुंदर दृश्य अनुभवण्याची संधी मिळेल. भारतातील या सर्वात सुंदर रेल्वे मार्गावर तुम्ही एकदा तरी प्रवास केलाच पाहिजे.