Indian Railway : भारतीय रेल्वेकडून पांबन पुलावर घेतली ट्रायल रन ; कधी सुरु होणार वाहतूक ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway : भारताच्या विकासात भर घालणारे अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन , मेट्रो प्रकल्प , रस्ते आणि पूल यांचा यात समावेश आहे. यापैकी काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर काही प्रकल्प पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहेत. आता भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल लवकरच पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. या पुलाची लिफ्ट स्पॅनची यंत्रणा पूर्ण झाल्यामुळे, दक्षिण रेल्वेने रविवारी संध्याकाळी नवीन पांबन रेल्वे सागरी पुलावर यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. ही चाचणी ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) टॉवर कार ब्रिज ओलांडून रामेश्वरम स्टेशनपर्यंत चालवली गेली.

सेंटर लिफ्ट स्पॅनची स्थापना जुलैच्या अखेरीस पूर्ण झाली, त्यानंतर गेल्या आठवड्यात पांबन पुलाच्या दोन्ही टोकांना ट्रॅक जोडणी पूर्ण झाली. नवीन पुलावर OHE टॉवर कारची चाचणी 2022 नंतर पहिलीच होती.

रेल्वे मंत्रालयाने पोस्ट केला व्हिडीओ

रेल्वे मंत्रालयाने या ट्रायल रनचा एक व्हिडीओ देखील शेअर केला असून ट्विट करीत म्हंटले आहे की, “नवीन पंबन पूल अंतिम रेषेच्या जवळ आहे! टॉवर कारची यशस्वी चाचणी नुकतीच भारतातील पहिल्या वर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिजवर घेण्यात आली. अशा आशयाचे ट्विट रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

कधीपर्यंत सुरु होणार पूल

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, 1 ऑक्टोबरपासून रामेश्वरमसाठी रेल्वे सेवा सुरू करण्याची योजना आहे. तर पुलाच्या बाबतीत सांगायचे झाले तर सप्टेंबरपूर्वी पूल तयार होईल अशी अपेक्षा असून यासाठी रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी वेगाने कामाला लागले आहेत.

काय आहे वैशिष्ट्ये ?

समुद्रसपाटीपासून 22 मीटर उंचीवर नेव्हिगेशनल एअर क्लिअरन्ससह व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज सध्याच्या पुलापेक्षा 3 मीटर उंच असेल. ट्रेन कंट्रोल सिस्टमसह इंटरलॉक केलेल्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल कंट्रोल सिस्टमचा (Vertical Lift Railway Bridge) वापर करून हा ऑपरेट केला जाईल. पांबन रेल्वे सागरी सेतूमध्ये 99 स्पॅन आहेत, प्रत्येकाची लांबी 18.3 मीटर आहे, तसेच 72.5 मीटरचा एक स्पॅन आहे.

हा रेल्वे पूल मुख्य भूमीला रामेश्वरम, एक ऐतिहासिक दक्षिण भारतीय शहर आणि चार धाम तीर्थस्थानांपैकी एक, उत्तरेकडील बद्रीनाथ, पश्चिमेला द्वारका आणि पूर्वेला पुरीशी जोडतो म्हणून हा पूल खूप महत्त्व आहे. हा पूल परंपरा आणि नवकल्पना यांच्या गतिशील समन्वयाचे उदाहरण देतो, जो भारताच्या विकास (Vertical Lift Railway Bridge) कथेचे वैशिष्ट्य आहे.