Indian Railways : रेल्वे प्रवासात फुकट्यांना बसला भुर्दंड ; रेल्वेच्या तिजोरीत 157 कोटी रुपयांचा महसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways : संपूर्ण भारतभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे प्रवास म्हणजे स्वस्त आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अशी रेल्वेची ख्याती आहे. मात्र अनेक सुखसोयी देणाऱ्या रेल्वे मध्ये फुकट प्रवास करणाऱ्या लोकांची काही कमी नाही. या फुकट्या प्रवाशांनी मात्र रेल्वेच्या तिजोरीत भर घातली आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तब्बल १५७ कोटी रुपयांचा महसूल मागच्या १० महिन्यात (Indian Railways) गोळा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही केवळ मुंबई ची आकडेवारी आहे. विचार करा मग संपूर्ण देशभरातील आकडेवारी काय असेल ?

दंडवसुलीच्या रकमेत ३५ टक्क्यांची वाढ (Indian Railways)

त्याच झालं असं की मुंबईत पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी स्थानक, पुलांवर फोर्टेस तिकीट तपासणीसह रेल्वेगाड्यांमध्येही तिकीट तपासणी मोहीम (Indian Railways) तीव्र करण्यात आली आहे. सध्या उन्हाळा तीव्र झाला आहे. त्यामुळे AC रेल्वे मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वातानुकूलित लोकल मध्ये देखील विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मागच्या १० महिन्याचा विचार केला तर मागच्या १० महिन्यात रेल्वेने १५७.१२ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या कालावधीत दंडवसुलीच्या रक्कमेत (Indian Railways) मागील वर्षापेक्षा ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात सुमारे १.०२ लाख विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

३ महिन्यात ५६ हजार हुन अधिक विनातिकीट

फेब्रुवारी महिन्यामध्ये उपनगरांमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची (Indian Railways) संख्या १.०२ लाख इतकी होती. मुंबई लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाने ६.४३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान ५६ हजार अधिक विनातिकीट प्रवासी पकडण्यात आले आहे. यामुळे दंडवसुलीच्या रकमेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे