Indian Railways Act : Indian Railways Act : ट्रेनमधून उडी मारल्यानंतर मिळू शकते का भरपाई ? काय सांगतो रेल्वे कायदा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways Act : भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही वेळा प्रवाशांना रेल्वे दुर्घटनांचा सामना करावा लागतो. अशावेळी रेल्वे कडून नुकसानभरपाई मिळते. मात्र नेमक्या कोणत्या घटनांमध्ये रेल्वेकडून भरपाई मिळते ? भरपाईची रक्कम किती असते ? याबाबत रेल्वेचे कायदा नेमका काय आहे ? चला जाणून घेऊया…

खरेतर नुकतेच कर्नाटक उच्च न्यायालयाने रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याआधी रेल्वे क्लेम ट्रिब्युनलने महिलेच्या मृत्यूची भरपाई देण्यास नकार दिला होता. ही महिला कर्नाटकातील चन्नापटना रेल्वे स्थानकावर चुकीच्या ट्रेनमध्ये चढली होती, तिची चूक लक्षात येताच तिने घाबरून चालत्या ट्रेनमधून उडी मारली, परिणामी तिचा मृत्यू झाला.

काय सांगतो नियम ? (Indian Railways Act)

रेल्वेतील अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडणाऱ्यांना विभाग नुकसान भरपाई देतो. मात्र, ही भरपाई रेल्वे विभागाची चूक असतानाच मिळते.रेल्वेचे नुकसान भरपाईचे दायित्व रेल्वे अधिनियम, 1989 च्या कलम 124 आणि 124A मध्ये विहित केलेले आहे. अशा परिस्थितीत, रेल्वे अपघातात जखमी किंवा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

किती मिळते नुकसान भरपाई ? (Indian Railways Act)

  • जर ट्रेन दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला असेल तर मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मिळतात. जर ट्रेन दुर्घटनेमध्ये गंभीर दुखापत झाली असेल तर अडीच लाख रुपये मिळतात आणि जर प्रवासी साधारण जखमी झाल्यास 50 हजार रुपये मिळतात.
  • एखादी अप्रिय दुर्घटना झाल्यास मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये मिळतात. एखाद्या अप्रिय घटनेमध्ये जर प्रवाशाला गंभीर दुखापत झाल्यास पन्नास हजार रुपये मिळतात आणि याच घटनेमध्ये जर प्रवाशाला साधारण दुखापत झाली असेल तर पाच हजार रुपये (Indian Railways Act) मिळतात.
  • मानव युक्त लेवल क्रॉसिंग दुर्घटना जर घडली असेल तर आणि यात व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर पाच लाख रुपये मिळतात आणि या घटनेमध्ये जर व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असेल तर अडीच लाख रुपये आणि जर साधारण दुखापत झाली असेल तर 50 हजार रुपये मिळतात.

पर्यायी प्रवास विमा योजना

1 सप्टेंबर 2016 पासून IRCTC पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ई-तिकीट बुक करणाऱ्या कन्फर्म/आरएसी रेल्वे प्रवाशांसाठी 0.92 रुपये प्रति प्रवासी प्रीमियमने एक पर्यायी प्रवास विमा योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत, रेल्वे अपघात/ अप्रिय घटनांमुळे आरक्षित प्रवाशांचा मृत्यू/ दुखापत झाल्यास पीडित/कुटुंब किंवा पीडितेच्या कायदेशीर वारसाला विम्याची रक्कम दिली जाते.रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 124 आणि 124A अंतर्गत विमा संरक्षण मूळ स्थानकावरून ट्रेनच्या प्रत्यक्ष सुटल्यापासून ते ठरलेल्या स्थानकावर ट्रेनचे वास्तविक आगमन होईपर्यंत वैध असेल. विमा योजना सर्व गाड्यांवरील सर्व आरक्षित वर्गातील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे (पॅसेंजर ट्रेन आणि उप-शहरी गाड्या वगळता) फक्त IRCTC वेबसाइटवर ऑनलाइन बुक केलेल्या तिकिटांसाठी ही सुविधा असेल.