Indian Railway : भारतात रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाला सुद्धा रेल्वेला आधी पसंती दिली जाते. कारण रेल्वेचं तिकीट भाडे कमी आहे. शिवाय प्रवासही आरामदायी होतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना रेल्वेच्या काही नियमांबद्दल माहिती नसेल. अशाच एका महत्वाच्या नियमाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या नातेवाईकांना ट्रेनला सोडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते. तुम्हाला या तिकिटावर रेल्वे प्रवास करता येऊ शकतो का ? चला पाहूया काय सांगतो नियम ?
बऱ्याचदा आपल्या सोबत असे झाले असेल की आपण आपल्या नातेवाईकांना रेल्वेला सोडण्यासाठी जात असाल आणि सामान ठेवण्याच्या घाई गडबडीत ट्रेन चालू होते. अशावेळी काय करायचे? तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नाही केवळ प्लॅटफॉर्म तिकीट आहे नेमक्या त्याच वेळेस जर टीटी आला तर ? अशावेळी घाबरू नका रेल्वेचा नियम काय आहे ? माहिती करून घ्या
काय आहे नियम ?
जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणीही ट्रेनमधून बाहेर टाकू शकत नाही. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही घाईगडबडीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला प्रथम TTE ला भेटावे लागेल. TTE ला भेटल्यानंतर तुम्हाला पुढील स्टेशनसाठी तिकीट खरेदी करावे लागेल आणि 250 रुपये दंड भरावा लागेल.