क्या बात ! पुढच्या महिन्यात भारतात धावणार पाण्यावर चालणारी ट्रेन ; कसा असेल मार्ग ?

first hydrogen train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला ‘नेट झिरो कार्बन एमिटर’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी रेल्वे अनेक नवीन पावले उचलत आहे. यामध्ये हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेनचाही समावेश आहे. पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच म्हणजे डिसेम्बर म्हणजे २०२४ मध्ये सुरू होऊ शकते. याआधी, या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी सुरू होईल. ही पहिली हायड्रोजन ट्रेन दिल्ली विभागाच्या 89 किमी लांबीच्या जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे.

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात धावणार आहे. डिसेंबरमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होईल.

35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची तयारी

पाण्यावर धावणाऱ्या 35 हायड्रोजन ट्रेन भारतात चालवण्याची तयारी सुरू आहे. या हायड्रोजन ट्रेनची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे, अशी माहिती रेल्वेचे पीआरओ दिलीप कुमार यांनी सांगितली आहे. खरं तर, भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला ‘नेट झिरो कार्बन एमिटर’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रेल्वेने हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी रेल्वे आणखी अनेक पावले उचलत आहे. यामध्ये पॉवर सेव्हिंग एचओजी तंत्रज्ञानाचा वापर आणि ट्रेनमध्ये एलईडी दिवे, कमी वीज वापरणारी उपकरणे आणि झाडे लावणे यांचा समावेश आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवर आणि जमिनीवरही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

2800 कोटींची तरतूद

हायड्रोजन ट्रेन प्रकल्पावर रेल्वे खूप पैसा खर्च करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 35 हायड्रोजन ट्रेनसाठी 2800 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. तसेच, हेरिटेज मार्गावरील हायड्रोजनशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी 600 कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत.

याशिवाय डिझेलपासून हायड्रोजनवर धावणारी डेमू ट्रेन चालवण्याचा प्रकल्पही रेल्वेने सुरू केला आहे. यासाठी 111.83 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रेनमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्यात येणार आहे. जमिनीच्या पातळीवर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.