Indian Railways : मोदींचा मेगा प्लॅन रेडी ; 25 हजार कोटींची बुलेट ट्रेन, 4500 हजार वंदे भारत, 1000 अमृत भारत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways : आपण जाणतोच की भारतीय रेल्वे ही भारताची धमनी म्हणून काम करते. दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून रेल्वेकडे पहिले जाते. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2024 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी भारतीय रेल्वेच्या आगामी विकास आणि रोडमॅप बद्दल माहिती दिली. यावेळी पुढच्या पाच वर्षात रेल्वेच्या होणाऱ्या विकासाबद्दल देखील त्यांनी माहिती दिली.

भारतीय रेल्वेच्या विकासाच्या आराखड्यानुसार, नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिडॉर लिमिटेडच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला अर्थ मंत्रालयाकडून सर्वात जास्त आर्थिक वाटा मिळाला आहे. बुलेट ट्रेन साठी 25000 करोड देण्यात आले आहेत. रेल्वेसाठीचे हे पॅकेज 19592 करोड वरून 25000 करोड पर्यंत वाढवण्यात आले आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर केवळ तीन तासांमध्ये पार करता येणार आहे.

4500 वंदे भारत ट्रेन

बुलेट ट्रेन शिवाय भारतीय रेल्वे 20४७पर्यंत 4,500 वंदे भारत ट्रेन आणणार आहे. सध्या देशामध्ये 82 वंदे भारत एक्सप्रेस रुळावर आहेत. याबरोबरच सरकार द्वारे 2024- 25 या वित्तीय वर्षात आतापर्यंत 50 नवीन अमृत भारत ट्रेन चालवल्या जाणार असं सांगितलं गेलं आहे. याशिवाय भारतीय रेल्वे कडून अशा प्रकारच्या एक हजार नवीन ट्रेन बनवल्या जाणार आहेत ज्याचं स्पीड हे 250 किलोमीटर प्रतितास असेल.

1,309 स्टेशनचा विकास

शिवाय केंद्र सरकारच्या अमृतभारत स्कीमच्या अंतर्गत जवळपास 1309 स्टेशनचा विकास केला जाणार आहे. या सुविधेअंतर्गत रेल्वेवर साफसफाई वायफाय, दिव्यांग व्यक्तीसाठी खास सुविधा रेल्वे द्वारा दिली जाणार आहे. याशिवाय दैनंदिन ट्रेनच्या फेऱ्या हा तीन हजार पर्यंत वाढवण्यात येणार आहेत. या मागणीची पूर्तता करण्यासाठी, जुन्या रोलिंग स्टॉकच्या जागी 7,000-8,000 नवीन ट्रेन सेटसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे.

गर्दी टाळण्यासाठी कॉरिडॉर

रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी देखील सुलभ असे कॉरिडॉर निर्माण केले जाणार आहेत. यामध्ये फ्लाय ओवर आणि अंडरपास चा निर्माण केला जाणार आहे. शिवाय प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा अधिक चांगला अनुभव घेता यावा करिता जवळपास 40000 ट्रेन बोगींमध्ये बदल करत त्यामध्ये वंदे भारत ट्रेन प्रमाणे गुणवत्ता दिली जाणार आहे. यासाठी जवळपास 15 हजार 200 करोड रुपये प्रस्तावित आहेत. याशिवाय 2030 पर्यंत मालगाड्यांची सुद्धा गती वाढवण्यात येणार आहे. मालगाड्यांची गती पन्नास किलोमीटर प्रति तास पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नॅशनल रेल्वे प्लॅन (NRP) चे उद्दिष्ट 2050 पर्यंत मालवाहतुकीतील रेल्वेचा आदर्श वाटा 45% पर्यंत वाढवणे आहे.