Indian Railways : पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करुन पहायलाच हवा; पुणे, मुंबईहून ‘या’ ठिकाणांना द्या भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railways : पावसाळा म्हणजे सर्वांचाच विशेष आवडता काळ, पावसाच्या कोसळणाऱ्या थेंबांसोबत आपसूकच उत्साहाने पावलं घराबाहेर पडतात. आजकाल प्रवास सहज शक्य होतो तो उपलब्ध असलेल्या पर्यटनाच्या साधनांमुळे, पावसाचे आकर्षण असलेल्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ठिकाण शोधण्याचा.  परतू नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पर्यटन करून आपण मनसोक्त आनंद घेऊ शकतो.  आज आपण मुंबई आणि पुण्याजवळ असलेल्या काही पर्यटन स्थलांबद्दल जाणून घेऊया.

Malshej Ghat
Malshej Ghat

१) माळशेज घाट – Malshej Ghat 

नैसर्गिक सौंदर्य, पसरलेली वनराई आणि स्तब्ध करणारे धबधबे यासाठी मालशेज घाट ओळखला जातो. हा मुंबईपासून १५४ किलोमीटर तर पुण्यापासून १६४ किलोमीटर अंतरावर आहे . पावसात डोंगरामधून वाहणारे धबधबे आणि चहुबाजूंनी पसरलेली हिरवीगार झाडी यामुळे घाटाचं सौंदर्य जास्ती खुलून जातं, हेच फोटोग्राफर्ससाठी विशेष आकर्षण आहे .इथे फ्लेमिंगो सारख्या अनेक पक्षांचे दर्शनही घेता येतं. मालशेजच्या भागात पर्ययटकांना राहण्याची सोय करण्यात आली आहे, शिवाय हॉटेल्स मधून स्थानिक खाद्य पदार्थांची मजा घेता येते.  माळशेज घाटात जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे . कल्याण रेल्वे स्थानक माळशेज घाटापासून सुमारे 85 किमी अंतरावर आहे.

Matheran
Matheran

२) माथेरान- Matheran (Indian Railways)

रायगड जिल्ह्यातील एक सुपरिचित हिल स्टेशन. हिरव्यागार वातावरणासाठी माथेरान प्रसिद्ध आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या पावसाळी बदलामुळे संपूर्ण स्थळाचे रुपांतर नयनरम्य दृश्यात होते. डोंगर, दऱ्यांना नवजीवन मिळाल्यागत सगळे खुलून जातात. शार्लेट सारखे धबधबे पावसाळी दिवसांत केंद्रबिंदू ठरतात. माथेरान व्हिवपोंईंटसाठी विशेष प्रसिद्ध आहे, अशावेळी एलेक्झेडर व्हीव‌ पोईंट सारखी काही विशेष नावं समोर येतात. माथेरानची टॉय ट्रेनने सफर केली जाऊ शकते. माथेरानला जाण्यासाठी पुणे – नेरळ किंवा  मुंबई-पुणे मार्गावर नेरळ स्टेशनवर (Indian Railways) उतरून तेथून खासगी गाडीने तुम्ही जाऊ शकता.

Mulshi Dam
Mulshi Dam

३) मुळशी धरण-

साहसप्रेमींसाठी ही उत्तम संधी म्हटली पाहिजे. पावसाळी पाण्यामुळे तुडुंब भरल्याने धरणाचे चित्र धबधब्यागत भासते. हिरवीगार झाडी, धुकं आणि ढगाळ वातावरणात वसलेलं धरण मनमोहक आहे. पावसाळी दिवसांत येथे हिरवळीचे रंगबिरंगी खेळ पहायला मिळतात. ताजी व थंड हवा आणि खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज मन प्रसन्न करतो. पर्यटकांना येथे  बोटिंग, ट्रेकिंग करण्याची संधी देखील उपलब्ध आहे.

Kanheri Cave
Kanheri Cave

४) कान्हेरी गुहा:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे कान्हेरी गुहा पहायला मिळतात. वर्षभर ह्या गुहा पर्यटकांना आकर्षित करीत असतात, तरीही पावसाळी दिवसांत येथे येणाऱ्यांना वेगळा अनुभव मिळतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूची पावसामुळे वनस्पती मनमोहन चित्र रेखाटते. कान्हेरी गुहा ह्या बुध्दांच्या गुहा आहेत पावसाच्या पाण्याचा सतत ऐकू येणारा आवाज एक शांत वातावरण निर्माण करतो. गुहांमध्ये असलेले कोरीवकाम आणि पसरलेली हिरवीगार निसर्गाची किमया नयनरम्य दृश्य निर्माण करते.