Indigo Airlines : धक्कादायक!! इंडिगो एअरलाईन्सचा निष्काळजीपणा; प्रवाशाला सँडविचमध्ये सापडला स्क्रू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indigo Airlines) सोशल मीडिया हा व्यक्त होण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ, प्रसंग, अनुभव शेअर करत अनेक लोक दररोज आयुष्यात घडणाऱ्या घटनांबाबत व्यक्त होताना दिसतात. यातील अनेक घटना धक्कादायक, विचित्र तर कधीकधी मनस्ताप देणाऱ्या असतात.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा पोस्ट कायम चर्चेत येतात. सध्या अशीच एक घटना इंडिगोच्या एका प्रवाशासोबत घडली आहे. जी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्याने शेअर केलेला फोटो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पाहूयात काय आहे हा फोटो आणि नेमकं या प्रवाशासोबत काय घडलं?

सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी केल्यानंतर जेवणात काहीतरी विचित्र गोष्ट सापडल्याचे निदर्शनास आल्याचे दिसते. याशिवाय अनेक मोठमोठ्या हॉटेलमध्येही असे प्रसंग घडतात. दरम्यान अशीच एक घटना इंडिगोच्या प्रवाशासोबत घडली आहे. (Indigo Airlines) इंडिगो विमानातून प्रवास करताना या प्रवाशाने सँडविच मागवले होते. जे खात असताना त्याला या सँडविचमध्ये स्क्रू असल्याचे आढळले. MacaroonIll3601 या रेडिट अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली असून या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

(Indigo Airlines)या प्रवाशाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘१ फेब्रुवारीला मी बंगळूरूवरुन चेन्नईला इंडिगोच्या विमानाने प्रवास करताना मला सॅन्डविचमध्ये स्क्रू दिसला. जेव्हा मी एअरलाइन्सला माफी मागण्यास सांगितले, तेव्हा त्यांचे उत्तर आले की मी हे सॅन्डविच फ्लाइटनंतर खाल्ले. मी कसा संपर्क करावा? जेणेकरुन यावर इंडिगो प्रतिक्रिया देईल’. या कॅप्शनसोबत त्याने हातात पकडलेल्या सॅंडविचचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे स्क्रू दिसतोय. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तसेच नेटकरी इंडिगो एअरलाईन्सच्या सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.