Indrayani New Serial : अवखळ इंदूच्या भेटीसाठी प्रेक्षक आतूर; ‘इंद्रायणी’च्या शीर्षकगीताला रसिकांची प्रचंड दाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Indrayani New Serial) अवघ्या महाराष्ट्राला सध्या जे कोडं पडलंय .. कोण आहे इंदू? तर इंदू अर्थातच ‘इंद्रायणी’! इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी.… एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी!! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल नि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिलीय.

INDRAYANI | New Show | Teaser 2 | From 25th March on Colors Marathi #Indrayani

गोड शीर्षकगीत (Indrayani New Serial)

आता या मालिकेचं एक गोड शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलंय आणि इंदूइतकंच तेही लोकांना खूप आवडतंय. ‘गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं.. पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं!!’ असे या शीर्षक गीताचे बोल आहेत. इंदूचं भावविश्व मांडणारं हे अर्थपूर्ण शीर्षकगीत लिहिलंय, प्रसिद्ध गीतकार आणि कवी दासू वैद्य यांनी तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केलंय. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने हे गीत गायलंय. हे गाणं कलर्स मराठीच्या फेसबुक पेजवर आणि युट्युबवर रसिकांना पाहायला मिळेल.

INDRAYANI | Title Montage | From 25 March, 7PM | Colors Marathi

‘इंद्रायणी’ मालिकेच्या प्रत्येक प्रोमोने रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचवलीय. कारण यात इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. (Indrayani New Serial) या दोन तगड्या कलाकारांबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे.

INDRAYANI | New Show | Teaser 3 | From 25th March on Colors Marathi #Indrayani

या मालिकेचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर करत आहेत. ‘जीव झाला येडापिसा’, ‘राजा रानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या पोतडी एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती करत आहे. या मालिकांचे दिग्दर्शक देखील विनोद लव्हेकरचं आहेत. (Indrayani New Serial) सध्या अवघा महाराष्ट्र जिची आतुरतेने वाट पहातोय, ती ‘इंद्रायणी’ महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. येत्या २५ मार्च २०२४ पासून सायं ७ वाजता ही मालिका सुरु होते आहे.