Instagram Reels : Instagram युजर्ससाठी खुशखबर ; आता 3 मिनिटापर्यंत बघता येणार रील्स

0
1
Instagram Reels
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Instagram Reels – जे लोक इंस्टाग्राम (Instagram) वापरतात त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता इंस्टाग्रामवर रील्स पाहण्याचा अंदाज बदलणार आहे. याबाबत इंस्टाग्रामने मोठा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी जाहीर केले की, आता रील्सची जास्तीत जास्त लांबी 3 मिनिटांपर्यंत वाढवली जाईल. हे बदल त्या क्रिएटर्ससाठी एक चांगली बातमी आहे जे इंस्टाग्रामवर लांब रील्स अपलोड करू इच्छित होते. तर चला या इंस्टाग्रामच्या महत्वाच्या निर्णयांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Instagram चा मोठा निर्णय –

Instagram वर रील अपलोड करण्याची लांबी 90 सेकंद म्हणजेच 1 मिनिट 30 सेकंद इतकी होती, पण आता ती लांबी दुप्पट करून 3 मिनिटं केली आहे. यासोबतच, यूट्यूबने देखील गेल्या वर्षी शॉर्ट्सची लांबी 3 मिनिटांपर्यंत वाढवली होती. अ‍ॅडम मोसेरी यांनी सांगितले की, इंस्टाग्राम (Instagram Reels) शॉर्ट-फॉर्म व्हिडीओवर लक्ष देत आहे. अनेक क्रिएटर्स इंस्टाग्रामवर रील्सची लांबी वाढवण्याची इच्छा व्यक्त करत होते, कारण 90 सेकंदांची लांबी त्यांना अडचणीची वाटत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

इंस्टाग्रामचा निर्णय वापरकर्त्यांसाठी फायदेशीर –

इंस्टाग्रामचा (Instagram) हा निर्णय अनेक वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु यामुळे प्‍लेटफॉर्मची ओळख बदलत आहे. 3 मिनिटांच्या व्हिडीओ फॉर्मेटमुळे इंस्टाग्राम आता यूट्यूब आणि टिकटॉक यांच्याशी थोड्या जास्त स्पर्धेत सामील झाला आहे. अशा प्रकारे, मोठ्या रील्सच्या अपलोडसाठी पर्याय देण्यामुळे युजर्सला किती आकर्षित केले जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लहान रील्सचे फायदे (Instagram Reels) –

लहान रील्सचे (Instagram Reels) फायदे हे होते की युजर्स कमी वेळात विविध प्रकारचा कंटेंट पाहू शकतात. 3 मिनिटांची रील्स म्हणजे युजर्सला एक व्हिडीओ पाहण्यात जास्त वेळ द्यावा लागेल, ज्यामुळे दुसऱ्या व्हिडीओकडे स्विच करताना त्यांना अधिक वेळ लागेल.यासोबतच इंस्टाग्रामवर आता प्रोफाइल ग्रिडवर चौकोनी बॉक्सऐवजी आयताकृती बॉक्समध्ये कंटेंट दिसेल. हळूहळू हा फीचर यूजर्ससाठी रोलआउट केले जाईल. इंस्टाग्रामचा हा निर्णय अनेकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हे पण वाचा : Suzuki ने लाँच केली इलेक्ट्रिक स्कूटर; Activa ला देणार टक्कर

NHM पुणे अंतर्गत 68 पदांची भरती; पात्रता काय? अर्ज कसा कराल?