विसराल ब्युटी पार्लर ; घरीच ट्राय करा इन्स्टंट ग्लो देणारा फेस पॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मैत्रिणींनो सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड हवेसोबत त्वचेच्या समस्या सुद्धा आपसूकच येतात. याबरोबरच आता लागणसरे सुद्धा सुरु झाली आहे. त्यामुळे तुमच्याही नातलगांमध्ये कार्यक्रम असतील आणि तुम्हाला उठावदार दिसायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही झकास होम रेमेडीज घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचिया स्किन काही मिनिटांतच ग्लो करायला लागेल. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा घरगुती फेसपॅक लावावा लागेल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पार्लरसारखी चमक येईल आणि तुमचे सौंदर्य वाढेल. चला जाणून घेऊया इन्स्टंट ग्लो देणाऱ्या फेस पॅक बद्दल …

साहित्य

  • 3 चमचे तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पून एलोवेरा जेल
  • 4 चमचे गुलाबजल
  • आवश्यकतेनुसार कच्चे दूध
  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

फेस पॅक कसा बनवायचा

  • झटपट ग्लो फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ, कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणी घालून चांगले मिसळा.
  • आता आवश्यकतेनुसार कच्चे दूध घाला आणि नंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला आणि सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा.
  • तुमचा झटपट ग्लो फेस पॅक तयार आहे.
  • आता 20 मिनिटे चेहऱ्यावर हा फेसपॅक राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.
  • यानंतर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर सौम्य मॉइश्चरायझर काळजीपूर्वक लावा.
  • मग काय! हा घरगुती झटपट फेस पॅक लावल्यानंतर, तुम्ही पार्लरमध्ये न जाता पार्लरसारखी चमक मिळवू शकता आणि तुमच्या पतीकडून प्रशंसा मिळवू शकता.