हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ( Life Insurance Corporation of India ) हि पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची असणारी कंपनी आहे. या कंपनीला सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ओळखले जाते. एलआयसी नेहमी आपल्या ग्राहकांसाठी कमी दारात आर्थिक संरक्षण प्रदान करत असते . पण या कंपनीने आपल्या एजंट्सचे कमिशन कमी केल्यामुळे एजंट्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तसेच नवीन सरेंडर व्हॅल्यू नियमांमुळे एलआयसीला अनेक पॉलिसींचे नियम बदलावे लागले आहेत. त्यामुळे एजंट्सच्या कमिशनमध्ये बदल करण्यात आले आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणजे इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने एलआयसी शाखांसमोर काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सरेंडर व्हॅल्यूचे नवीन नियम
1 ऑक्टोबर 2024 पासून सरेंडर व्हॅल्यूचे (Surrender Value) नवीन नियम लागू झाला आहे. सरेंडर व्हॅल्यू म्हणजे पॉलिसीधारकाने विमा पॉलिसीची पूर्ण रक्कम घेण्यासाठी पॉलिसी कालावधीच्या संपण्याआधी पॉलिसी रद्द केल्यास विमा कंपनीकडून दिली जाणारी रक्कम. या नियमामध्ये पॉलिसीचा पहिला प्रीमियम भरल्यानंतरही पॉलिसी सरेंडर केल्यास प्रीमियमचा काही भाग ग्राहकांना परत मिळणार आहे. या बदलांमुळे एजंट्सचे कमिशन कमी होणार असल्याने एजंट्समध्ये असंतोष पसरलेला आहे.
देशभरात आंदोलनाची तयारी
हा नियम एलआयसीने बदलावा यासाठी एजंट फेडरेशनने 30 ऑक्टोबरपर्यंत देशभरात आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनामुळे एलआयसीवर दबाव येईल आणि त्यांचा निर्णय मागे घेईल असे एजंट फेडरेशनला वाटत आहे. एजेंट फेडरेशन सांगत आहे कि , या निर्णय घेण्यापूर्वी एलआयसीने त्यांच्याशी सत्तामसलत केला नाही . हे नवीन नियम एजेंट किंवा पॉलिसीधारकाच्या हिताचे नाहीत असे त्यांचे मत आहे .