बंद होण्याआधी सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; मिळेल उत्तम नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार महिलांच्या कल्याणासाठी नेहमी प्रत्नशील असते . त्यांच्यासाठी ते नवनवीन योजना घेऊन येतात . केंद्र सरकारने महिलासाठी सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजना 2023 मध्ये सुरू केली होती . हि येत्या वर्षी बंद होण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. याचाच अर्थ कि महिलांकडे गुंतवणुकीसाठी केवळ चार महिने बाकी राहिलेले आहेत. आतापर्यंत या योजनेत सुमारे 30000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे , ही योजना एफडीपेक्षा जास्त व्याजदर देते असून , ती जोखीममुक्त आहे. त्यामुळे महिलांसाठी ही योजना जास्त आकर्षक ठरत आहे.

फिक्स्ड रिटर्न

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजनेत गुंतवणुकीवर दरवर्षी 7.5% व्याज मिळते. हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते . समजा एखाद्या महिलेने 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर दोन वर्षांनी तिला एकूण 232044 रुपये परत मिळणार आहेत . या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फिक्स्ड रिटर्न मिळतो आणि शेअर बाजारासारख्या जोखमींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना अधिक नफा कमवण्याची संधी प्राप्त होते.

आवश्यक पात्रता

या योजनेचे खाते ओपन करण्यासाठी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही महिला पात्र असून , त्यांना ते खाते उघडता येते . महिलांच्या मुलींसाठी देखील त्यांच्या नावाने खाती उघडता येतील. खाती कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ठराविक बँकांमध्ये उघडता येतील. त्यात बँक ऑफ बडोदा, केनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

योजनेचा कालावधी

तुम्हाला यामध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल . तसेच जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असून , काही इमर्जन्सी परिस्थितीत खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर एकूण रकमेच्या 40% पर्यंत रक्कम काढता येईल. हि योजना 2023 मध्ये सुरू झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील या योजनेत आपले खाते उघडले होते. महिलांसाठी ही योजना सुरक्षित आणि फायदेशीर आहे. योजना बंद होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेत गुंतवणूक करून महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा.