‘या’ SIP मध्ये फक्त 250 रुपयांची गुंतवून करा अन मिळावा 17 लाख रुपयांचा नफा

sip
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी प्रत्येकजण विविध ठिकाणी गुंतवणूक करत असतात. पण योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे महत्वाचे असते. हि केलेली गुंतवणूक सेवानिवृत्तीनंतर फायदेशीर ठरते. कारण यातून मिळणारा परतावा मोठा असतो. यासाठीच भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला जर भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करायची असेल , तर सबीआयच्या एसआयपी (SIP) योजना तुमच्यासाठी खास ठरू शकते. अन यातून मिळणारा नफा हि जास्त असेल.

एसबीआय जननिवेश एसआयपी योजना –

एसबीआय म्युच्युअल फंड अन स्टेट बँकेने ‘एसबीआय जननिवेश एसआयपी’ (SBI Jannivesh SIP Scheme) ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील मध्यमवर्गीय लोकांना म्युच्युअल फंड गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करणे अन त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवणे. या सुरु केलेल्या योजनेत तुम्ही फक्त 250 पासून गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेत तुमच्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

दर महिन्याला फक्त 250 रुपये गुंतवा –

तुम्ही जर एसबीआयच्या एसआयपी योजनेत दर महिन्याला 250 रुपये गुंतवले , तर तुम्हाला 30 वर्षांनंतर तुम्ही 17 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच जर तुम्ही 15% वार्षिक परतावा मानला, तर 250 रुपयांची गुंतवणूक दर महिन्याला केल्यास 17.30 लाख रुपये जमा होऊ शकतात. यामध्ये तुमच्या 90,000 रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीवर 16,62,422 रुपये रिटर्न मिळू शकतात. यासोबतच 40 वर्षांपर्यंत एसआयपी योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 78 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दर महिन्याला फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. 40 वर्षांनी एकूण 1.20 लाख रुपये जमा होतील आणि त्यावर 77,30,939 रुपये रिटर्न मिळू शकतो. यामुळे तुमच्या एकूण रकमेची किंमत 78 लाखांपेक्षा जास्त होईल.

योजनेचे फायदे –

छोट्या रकमेपासून सुरूवात करा.

दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळवता येते.

चक्रवाढ व्याजाचा फायदा

12-16% वार्षिक परतावा (साधारणतः)

250 रुपयांपासून सुरूवात करा .

एसबीआयच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही आपल्या भविष्याला एक मजबूत आर्थिक पाया निर्माण करू शकता.