Investment Plan : SCSS की बँक FD? जेष्ठ नागरिकांसाठी काय ठरेल बेस्ट?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) भारतात गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात विविध गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बँक एफडी आणि ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या योजना जोखीममुक्त परताव्यासाठी जेष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र तरीही बँक FD आणि ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना या दोन्हीपैकी एका योजनेची निवड करायची असेल तर कोणती योजना अधिक फायदेशीर आहे? याबाबत कायम संभ्रम दिसून येतो.

अनेकदा या दोन योजनांमध्ये कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरेल? याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे पहायला मिळते. (Investment Plan) वयवर्षे ६० पूर्ण झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS आणि ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव म्हणजेच बँक FDमध्ये गुंतवणूक करणे पसंत केले जाते. तरीही अधिक सुरक्षा आणि जोखीममुक्त परताव्याची कोणती योजना निवडणे फायदेशीर ठरेल याविषयी जाणून घेऊ. यासाठी आधी दोन्ही योजनांविषयी आवश्यक माहिती घेऊ आणि त्यानंतर दोन्हीतील मुख्य फरक याविषयी सविस्तर माहिती घ्या.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना अर्थात SCSS ही योजना शासनामार्फत राबवली जाणारी सुरक्षित योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात शिवाय चांगला परतावा देखील मिळतो. (Investment Plan) आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदारांना १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. या योजनेच्या परिपक्वतेचा कालावधी हा एकूण ५ वर्षांचा असतो. मात्र गुंतवणूकदाराची इच्छा असेल तर पुढे ३ वर्षांसाठी हा कालावधी वाढवून घेता येतो.

या योजनेंतर्गत देशभरातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडता येते. तसेच देशभरातील कोणत्याही शाखेत तुमचे खाते हस्तांतरित करून घेता येईल. (Investment Plan) या योजनेत केवळ १००० रुपये गुंतवणूक खाते सुरु करता येते. पुढे ही रक्कम हजाराच्या पटीत वाढवता येते. यामध्ये एका आर्थिक वर्षात ३० लाख रुपये जमा करता येतात. या योजनेवर ८.२ टक्के दराने वार्षिक व्याज मिळते.

ज्येष्ठ नागरिक एफडी योजना (Investment Plan)

बँकेतील सामान्य एफडीच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना या योजनेंतर्गत बँकांमध्ये विशेष व्याज दिले जाते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये या योजनेत विशेष पसंती दाखवली जाते. साधारणपणे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज प्रदान केले जाते. यात दरमहा, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक स्वरूपात व्याजाचे पैसे मिळतात. तर काही FD वर कर लाभदेखील उपलब्ध आहेत. या योजनेच्या परिपक्वतेच कालावधी एकूण ५ वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतो.

SCSS आणि FD योजनेतील फरक

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेना ही 80C अंतर्गत येते. तसेच गुंतवणूकदारांना वार्षिक स्वरूपात ८.२ टक्के व्याज दिले जाते. तर FD मध्ये ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास कोणताही कर लाभ मिळत नाही. या योजनांमधील महत्वाचा फरक असा की, SCSS अंतर्गत कमाल गुंतवणूक मर्यादा आहे. (Investment Plan) तर FD मध्ये अशी कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय FD अनेक पर्यायांसह फायदेशीर ठरते. त्यामुळे दोन्ही योजना उत्तम असून यांपैकी कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी निवडावा हे गुंतवणूकदाराच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी किती रक्कम आहे? यावर अवलंबून असते.