Investment Plan : पैशाचे ‘असे’ नियोजन बनवेल तुम्हाला श्रीमंत; पहा कुठे आणि कशी गुंतवणूक कराल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) आजच्या काळात पैसा जितका महत्वाचा आहे तितकेच महत्वाचे आहे पैशाचे नियोजन. कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला गेला तर भविष्यात त्याचा चांगला लाभ होतो. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणुकीबाबत लोक सतर्क होताना दिसत आहेत. सध्या गुंतवणुकीसाठी अनेक सुरक्षित आणि चांगला परतावा देतील असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आपल्या आर्थिक क्षमतेनुसार आपण गुंतवणुकीचा पर्याय शोधायला हवा. जो आपली गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित ठेवून चांगला परतावा देऊ शकेल.

याशिवाय कमीत कमी गुंतवणूक करून अधिक नफा मिळवता येणार असेल, तर तो कुणाला नको असेल? यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीसाठी एक चांगला, सुरक्षित आणि उत्तम पर्याय शोधात असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करू शकता. (Investment Plan) यामध्ये कमीत कमी रक्कम गुंतवणूक तुम्हाला मोठ्यातला मोठा नफा मिळवता येईल. यासाठी तूम्हाला योग्य प्रकारे पैशाचे नियोजन करायला हवे. ते केल्या काही वर्षांतच तुम्ही कोट्यवधी मिळवू शकता. ते कसे? याविषयी जाणून घेऊ.

SIP तील गुंतवणुकीतून मिळवा कोट्यवधींचा परतावा (Investment Plan)

गुंतवणुकीसाठी सगळ्यात महत्वाचे असते ते पैशांचे नियोजन. जे म्युच्युअल फंडातील SIP च्या माध्यमातून तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. यामध्ये तुम्ही कमी काळात कमी गुंतवणूक करूनही चांगला परतावा मिळवू शकता. अगदी १० वर्षात तुम्ही करोडपती होऊ शकता. ते कसे? तर तुम्ही दरमहा ३६ हजार रुपयांची गुंतवणूक केलात तर १५% परताव्यानुसार १० वर्षाच्या व्याजासोबत तुमची गुंतवणूक १,००,३१,६६२ रुपये इतकी होईल. अर्थात तुम्ही १० वर्षात करोड रुपये कमवाल.

याचे नीट कॅल्क्युलेशन (Investment Plan) तपासले तर समजेल की, प्रति महिना ३६ हजाराने तुम्ही १० वर्षात एकूण ४३,२०,००० रुपये जमा कराल. ज्यावर तुम्हाला ५७,११,६६२ रुपयांचा परतावा मिळेल. यात जर तुम्ही १५ वर्षात करोडपती होण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मासिक स्वरूपात १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. अशाप्रकारे तुम्ही १० वर्ष, १५ वर्ष किंवा मग अगदी २० वर्षांसाठी देखील प्रतिमहिना विशिष्ट रक्कम गुंतवून करोडो रुपये कमावू शकता.

निवड चुकता कामा नये

जर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये योग्य फंडाची निवड करणे महत्वाचे असते. मग यासाठी तुम्ही फायनान्शियल प्लॅनर, वर इन्व्हेस्टमेंट प्लॅनर्सची मदत घेऊ शकता. (Investment Plan) ज्यामुळे तुम्ही योग्य फंडाची निवड कराल आणि कमी काळात अधिक फायदा मिळवू शकाल. हे प्लॅनर्स तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करून कुठे गुंतवणूक करावी आणि कशी करावी तसेच त्याचा पुढे काय फायदा वा तोटा होतो हे सविस्तर सांगतात.