Investment Scheme – टॅक्स सेव्हिंग आणि बेस्ट रिटर्न्ससाठी ‘या’ योजनांमध्ये करा इन्व्हेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Scheme) आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हीही चांगल्या योजनांच्या शोधात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा योजनांची माहिती देणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कारबचतीसह चांगल्या परताव्याचा लाभ घेता येणार आहे.

गेल्या काही काळात गुंतवणूकदारांची संख्या वाढताना दिसली आहे. त्यामुळे विविध योजना आणि त्यांच्या माध्यमातून होणारे लाभ याविषयी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेत. अनेकदा आपण एखाद्या योजनेत गुंतवणूक करतो आणि पूर्ण माहिती न घेतल्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी जर आपल्याला अधिक लाभदायी ठरणाऱ्या योजनांची माहिती असेल तर आपल्याला पुढे जाऊन का? आणि कशाला? असे प्रश्न पडणार नाहीत.

(Investment Scheme) आज आपण अशा काही उत्तम योजनांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर समाधान व्यक्त करू शकता. कारण या योजनांमध्ये तुम्ही कर वाचवू शकता आणि त्यासोबत गुंतवणूक करून चांगला परतावासुद्धा मिळवू शकता. पब्लिक प्रोविडेंट फंड, सुकन्या समृद्धी योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या योजनांची आपण आज माहिती घेणार आहोत. शिवाय या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळणार याविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत.

पब्लिक प्रोविडेंट फंड, सुकन्या समृद्धी योजना आणि नॅशनल पेन्शन स्कीम या योजना संपूर्ण देशभरात लोकप्रिय आहेत. कारण या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास केवळ तुमचे भविष्य सुरक्षित होत नाही तर तुमच्या मुलीचं लग्न किंवा शिक्षण यासाठीदेखील पैसे वाचवता येतात. चला तर या योजनांबद्दल तपशीलवार माहिती घेऊया. (Investment Scheme)

1) पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF- Public Provident Fund)

गुंतवणूकदारांना आपले पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी पब्लिक प्रोविडेंट फंड म्हणजेच पीपीएफ हा उत्तम पर्याय मानला जातो. कारण या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला विविध फायदे मिळतात. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यास ७.१ टक्के व्याज मिळते. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो. पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सगळे पैसे काढून घेऊ शकता किंवा मॅच्युरिटीदरम्यान पैशांची गरज नसेल तर आणखी ५ वर्षांसाठी याचा कालावधी वाढवून घेऊ शकता.

(Investment Scheme) या योजनेत किमान ५०० रुपये ते कमाल १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. कमीत कमीत पैसे गुंतवून लाखो रुपयांचा फायदा देणाऱ्या या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचादेखील लाभ मिळतो.

2) सुकन्या समृद्धी योजना (SSY)

केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही एक लहान ठेव योजना आहे. जी फक्त मुलींसाठी सुरु करण्यात आली आहे. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली हि योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा निधी तयार करू शकतात. या योजनेचा लाभ पोस्ट ऑफिस, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि काही खाजगी बँकामध्ये आवश्यक कागदपत्रे जमा केल्यास घेता येतो. (Investment Scheme)

या योजनेअंतर्गत एका मुलीसाठी एक खाते आणि एक कुटुंब केवळ २ सुकन्या समृद्धी योजनेचे खाते सुरु करू शकतात. यासाठी मुलींचे वय १० वर्षांपेक्षा कमी असावे. या खात्यात किमान २५० रुपये ते कमाल १ लाख ५० हजार रुपये प्रतिवर्षं भरण्याची मुभा दिलेली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने ८.२ टक्के व्याज मिळते आणि यासोबत गुंतवणूकदाराला कर कपातीचादेखील लाभ मिळतो.

3) राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS)

केंद्र सरकारने नागरिकांना निवृत्तीनंतर वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना जानेवारी २००४ मध्ये सुरू केली. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली ही सेवा पुढे २००९ मध्ये सर्व श्रेणींसाठी खुली करण्यात आली. सेवानिवृत्ती नियोजनाच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही अंशदायी पेन्शन योजना सरकारद्वारे चालवली जाते. (Investment Scheme)

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस शेअर्समध्ये गुंतवणूक करता येते. या योजनेत वार्षिक किमान ६,००० रुपये ते कमाल कितीही रक्कम गुंतवता येते. मात्र या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयकरात सवलत मिळते.