IPL 2025: गौतम अदानी गुजरात टायटन्स खरेदी करणार ? 12,550 कोटींच्या बोलीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IPL 2025: भारत आणि क्रिकेट यांचे नाते काही नव्याने सांगण्याची गरज नाही. भारतामध्ये क्रिकेटचे मोठे चाहते आहे. अशातच क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अब्जाधीश गौतम अदानी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मोठे पाऊल टाकणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गुजरात टायटन्स फ्रँचायझीमध्ये बहुसंख्य स्टेक घेण्यासाठी CVC कॅपिटल्स पार्टनर्सशी बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.

“द इकॉनॉमिक टाईम्स” च्या मते, CVC कॅपिटल्स पार्टनर्स, यांनी 2021 मध्ये गुजरात टायटन्स फ्रँचायझी 5,625 कोटी रुपयांना ($745 दशलक्ष) विकत घेतली होती. आता या IPL संघाच्या विक्रीसाठी अदानी ग्रुप आणि टोरेंट ग्रुप या दोघांशी बोलणी सुरु असल्याची (IPL 2025) माहिती आहे.

गुजरात टायटन्सच्या संघाशी नवी नावे जोडणार असल्याच्या चर्चा आहेत. सरम्यान या टीमचे मूल्यांकन झपाट्याने वाढले आहे, जे सध्या $1 अब्ज ते $1.5 बिलियन दरम्यान अंदाजे आहे. संघाची तीन वर्षांपूर्वीच्या पहिल्या सत्रातील यशस्वी कामगिरी आणि टीमचा (IPL 2025) परफॉर्मन्स हेच त्यांच्या मूल्य वाढीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नवीन संघांसाठी लॉक-इन कालावधी समाप्त करणार आहे. जेणेकरून फेब्रुवारी 2025 पासून त्यांचे स्टेक विकू शकतील. या नियमातील बदलामुळे अदानीसारख्या संभाव्य गुंतवणूकदारांना आयपीएलमध्ये प्रवेश करण्याची किंवा त्यांचा प्रभाव वाढवण्याची संधी मिळेल. त्यामुळे संघ विकत घेणाऱ्यांना संधी मिळणार असून यामध्ये कोणत्या नावांचा समावेश असेल ? याबाबत (IPL 2025) उत्सुकता व्याख्या केली जात आहे.

अदानी समूहाचे क्रिकेट उपक्रम

तसे पाहायला गेल्यास अदानी समूह आधीपासूनच महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये भारतीय क्रिकेटशी संबंधित आहे, जिथे त्याची मालकी गुजरात जायंट्स फ्रँचायझी आहे. जी 2023 मध्ये 1,289 कोटी रुपयांना विकत घेण्यात आली होती. अदानी समूह या (IPL 2025)गेममध्ये आपली उपस्थिती वाढवण्यासाठी जोरदार सक्रिय आहे.

2021 मध्ये, अदानी समूहाने गुजरात टायटन्सची मालकी घेण्यासाठी 5,100 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर टोरेंट समूहाने फ्रेंचायझीसाठी 4,653 कोटी रुपयांची बोली लावली होती. शेवटी, CVC Capitals’ Irelia Sports India ने सर्व स्पर्धकांना मागे टाकून संघ मिळवला.

GT ची कामगिरी

गुजरात टायटन्स ने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 2021 मध्ये पहिल्या सत्रातलं आयपीएल जिंकलं होतं. त्यामुळे क्रिकेट विश्वास विशेषतः आयपीएल विश्वामध्ये या संघाने आपलं एक स्थान बाजबूत केलं आहे. त्यामुळे गुजरात टायटन्सचं बाजारातलं मूल्य हे वाढलेले दिसून येत आहे. आयपीएल मधील एक प्रकारची मौल्यवान फ्रॅंचायजी पैकी एक म्हणून गुजरात टायटन्स आपलं स्थान मजबूत केलेलं दिसून (IPL 2025) येत आहे