IPL Final : आयपीएल २०२५ हंगाम आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. यंदाच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि पंजाब किंग्स यांच्यात निर्णायक लढत होणार आहे. विशेष म्हणजे दोघीही संघांनी आजवर आयपीएलचा किताब जिंकलेला नाही, त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.
फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
या मोसमात एकूण ७३ सामने खेळले गेले असून फायनल मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
पंजाब आणि आरसीबी; लीग टप्प्यात टॉप २ मध्ये
या हंगामाची सुरुवात आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने झाली होती. पंजाबने लीग टप्प्यात अव्वल स्थान पटकावले, तर आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. विशेष म्हणजे आरसीबीचा घराबाहेरचा परफॉर्मन्स १००% यशस्वी राहिला. अहमदाबादमध्ये २०२१ मध्ये झालेल्या एका सामन्यात पंजाबने आरसीबीवर विजय मिळवला होता, मात्र क्वालिफायर-१ मध्ये आरसीबीने पंजाबवर मात केली.
हवामानाचा खेळात हस्तक्षेप?
क्वालिफायर-२ सामन्यादरम्यान देखील अहमदाबादमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. सामन्याच्या टॉसनंतर पाऊस सुरू झाला आणि २ तास १५ मिनिटांची विलंबाने खेळ सुरू झाला. तरी सामना २० ओव्हरचा पूर्ण खेळवला गेला. या पार्श्वभूमीवर फायनलच्या दिवशी देखील पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होईल ?
2023 च्या फायनलप्रमाणेच यंदाही रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. 3 जूनला सामना न झाल्यास तो 4 जून, बुधवारी खेळवला जाईल. बीसीसीआयने यंदा अधिक काळासाठी प्लेऑफसाठी वेळ वाढवला आहे. म्हणजेच सामन्याला सुरुवात होण्यासाठी रात्री 9:30 पर्यंतचा वेळ आहे, तोपर्यंत सामन्यात ओव्हर्स कमी करण्यात येणार नाहीत.
सामना पूर्ण न झाल्यास काय?
- 11:56 PM पर्यंत पाच ओव्हरचा सामना सुरु होऊ शकतो.
- जर त्या वेळेतही सामना शक्य नसेल, तर सुपर ओव्हर खेळवला जाईल.
सुपर ओव्हरसाठी 20 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल, म्हणजे तो 12:30 AM पर्यंत सुरू होऊ शकतो. - जर सुपर ओव्हरही शक्य झाला नाही, तर सामना रद्द करण्यात येईल. चॅम्पियन कोण?
जर सामना पूर्णपणे रद्द झाला आणि सुपर ओव्हरही होऊ शकला नाही, तर लीग स्टेजमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पंजाब किंग्सला विजेता घोषित करण्यात येईल. आयपीएल फायनलवर पावसाचे सावट आहे, पण बीसीसीआयने सर्व शक्य त्या उपाययोजना केल्या आहेत. अंतिम निर्णय रिझर्व डे, सुपर ओव्हर आणि शेवटी लीग टेबलच्या आधारे घेतला जाणार आहे. आता पाहायचे म्हणजे, क्रिकेट देव कोणाच्या बाजूने असतो – आरसीबी की पंजाब?