दमदार फीचर्ससह iQOO Z10 अन iQOO Z10x भारतात लाँच; पहा किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iQOO कंपनीने आपले दोन नवीन स्मार्टफोन iQOO Z10 आणि iQOO Z10x भारतात अधिकृतपणे लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन्स आधुनिक फीचर्स, दमदार परफॉर्मन्स अन नवीन Android 15 आधारित Funtouch OS 15 सॉफ्टवेअरसह सादर करण्यात आले आहेत. iQOO Z10 आणि Z10x हे विविध वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या किंमत विभागांमध्ये आणले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना पर्याय उपलब्ध होणार आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

iQOO Z10 आणि iQOO Z10x स्मार्टफोन –

iQOO Z10 मध्ये 7300mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यामुळे वापरकर्त्यांना दीर्घकाळ स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव मिळतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसरचा समावेश आहे, जो गतीशील परफॉर्मन्ससाठी ओळखला जातो. दुसरीकडे, iQOO Z10x मध्ये 6500mAh बॅटरी व 44W फास्ट चार्जिंग देण्यात आले असून MediaTek Dimensity 7300 चिपसेट वापरले गेले आहे.

डिस्प्ले –

डिस्प्लेच्या बाबतीत iQOO Z10 मध्ये 6.77 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले असून याला 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000 निट्स ब्राइटनेस सपोर्ट आहे. iQOO Z10x मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे, ज्यात देखील 120Hz रिफ्रेश रेट आहे. दोन्ही फोन्स Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना आधुनिक आणि सहज अनुभव मिळतो.

कॅमेरा –

कॅमेरा विभागात, iQOO Z10 आणि Z10x मध्ये 50MP प्रायमरी आणि 2MP सेकंडरी रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे, जो उत्तम गुणवत्तेचे फोटो कॅप्चर करतो.

कधी पासून विक्री –

iQOO Z10 हा 16 एप्रिलपासून Amazon India आणि iQOO India स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. Z10 हे Glacier Silver आणि Stellar Black रंगांमध्ये तर Z10x हे Ultramarine आणि Titanium रंगांमध्ये मिळणार आहेत. अतिरिक्त फीचर्समध्ये iQOO Z10 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर आणि IP65 रेटिंग आहे. तर iQOO Z10x मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स, IP64 रेटिंग, Bluetooth 5.4 आणि Wi-Fi 6 यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

किंमत –

किंमतीच्या बाबतीत, iQOO Z10 चे 8GB + 128GB मॉडेल 21,999 रु , 8GB + 256GB रु 23,999 आणि 12GB + 256GB रु 25,999 ला उपलब्ध आहे. मात्र बँक ऑफर्सनंतर iQOO Z10 ची सुरुवातीची किंमत रु 19,999 इतकी कमी होते. iQOO Z10x चे 6GB + 128GB मॉडेल रु 13,499, 8GB + 128GB 14,999 रु आणि 8GB + 256GB रु 16,499 ला मिळते, ज्याची ऑफर्सनंतर सुरुवातीची किंमत रु 12,499 आहे.

iQOO चे हे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स विविध वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत, खासकरून जे मजबूत बॅटरी, स्टायलिश डिझाईन आणि नवीनतम सॉफ्टवेअर अनुभव शोधत आहेत.