देशभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. अद्यापही शाळा सुरु झाल्या नसल्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत एक झक्कास ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. IRCTC कडून बेटांची दुनिया म्हणजेच अंदमान-निकोबार ट्रिप चे खास नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये तुमचा प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असेल. चला जाणून घेऊया या खास टूर पॅकेज बद्दल ..
IRCTC च्या या टूर पॅकेज चे नाव LTC ANDAMAN AIR PACKAGE असे आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. या सहलीला कोलकाता येथून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला अंदमानमधील अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल.
Give yourself the much-awaited travel break with IRCTC’s LTC Andaman Air tour.
— IRCTC (@IRCTCofficial) November 1, 2024
Book your 5N/6D package at https://t.co/R2F9RRXe7D#IRCTCForYou #ThinkTravelThinkIRCTC #IRCTCAt25 #TravelPackages #Andaman #IRCTCPackages #IRCTCTour #Travel #Trip #PlacesOfIndia pic.twitter.com/yGYMc30kcI
किती दिवसांची ट्रिप ?
ही सहल 5 रात्री आणि 6 दिवसांची असेल. हे पॅकेज 9 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर, 07 डिसेंबरसाठी आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तारीख निवडा आणि पॅकेज बुक करू शकता. हे पॅकेज बुक केल्यावर तुम्हाला फ्लाइटने अंदमानला नेले जाईल.
किती येईल खर्च ?
या पॅकेजमध्ये, तुम्ही सिंगल ऑक्युपन्सीसाठी तिकीट बुक केल्यास तुम्हाला65,225रुपये, डबल शेअरिंग 48,155रुपये, ट्रिपल शेअरिंग 46,455 रुपये खर्च येईल. या सहलीत 5 ते 11 वर्षांचे मूल तुमच्यासोबत गेले तर तुम्हाला 39,275 रुपये मोजावे लागतील. तर 2 ते 5 वर्षांचे मूल गेल्यास 35,810 रुपये मोजावे लागतील.
आधीक माहितीसाठी 8595904080/ 8595904073 या क्रमांकावर संपर्क करू शकता. किंवा www.irctctourism.com या वेबसाईटला भेट देऊ शकता.