भीमशंकर, त्र्यंबकेश्वर सह करा स्वस्तात तीर्थाटन ; IRCTC ने आणली आहे ‘पंच ज्यीतीर्लिंग यात्रा’

IRCTC pancha jyotirling yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आता पावसाळा संपून थंडी सुरु झाली आहे. वातावरण या काळात बऱ्यापैकी आल्हाददायक असते. तुम्ही सुद्धा सध्याच्या काळात कुठे बाहेर फिरायला जाणार असाल किंवा तीर्थक्षेत्रांची यात्रा कार्य इच्छित असाल तर तुमच्यासाठी IRCTC कडून स्वस्त आणि मस्त पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला एकाच वेळी भीमशंकर, त्र्यंबकेश्वर गृहेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, शिर्डी येथे फिरण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती

पंच ज्योतिर्लिंग यात्रा पॅकेज

IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव आहे पंच ज्योतिर्लिंग यात्रा पॅकेज. या पॅकेजमध्ये तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. या सहलीला मदुराई येथून सुरुवात होणार आहे.

काय पाहाल ?

या टूर अंतर्गत तुम्हाला भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, गृणेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि शिर्डी या ठिकाणी फिरायला मिळणार आहे. ही ट्रीप पाच रात्री आणि सहा दिवसांची असून हे पॅकेज 28 नोव्हेंबर 2024 करिता आहे म्हणजेच तुम्हाला 28 नोव्हेंबरला या पॅकेज अंतर्गत फिरायला जायचं असेल तर तुम्ही आतापासूनच या पॅकेज बुकिंग करू शकता.

किती येईल खर्च?

तुम्ही या पॅकेज अंतर्गत एकट्याने प्रवास करू इच्छित असाल तर तुम्हाला एकट्यासाठी ४२ हजार चारशे रुपये खर्च येईल. जर तुम्ही दोघेजण प्रवास करणार असाल तर या पॅकेज अंतर्गत 35 हजार 700 रुपये आणि तिघांकरिता 34500 खर्च येऊ शकतो. जर तुमच्यासोबत पाच ते अकरा वर्षांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी 29 हजार पाचशे रुपये लागतील तर दोन ते चार वर्षाच्या मुलांसाठी 24 हजार रुपये लागतील.

पॅकेजमध्ये काय मिळेल?

या पॅकेज मध्ये तुम्हाला मदुराई- मुंबई- मदुराई अशाप्रकारे प्रवास करण्यासाठी तिकीट मिळेल. चांगल्या एअर कंडिशन रूम्स मिळतील. पाच वेळचा नाष्टा आणि पाच वेळचे रात्रीचे जेवण तुम्हाला या पॅकेज मध्ये मिळणार आहे. तुमच्यासोबत टूर्स मॅनेजर उपलब्ध असेल. ट्रॅव्हल इन्शुरन्स सुद्धा या टूर पॅकेज मध्ये तुम्हाला मिळणार आहे.

काय आहे या टूरची कॅन्सलेशन पॉलिसी?

ही टूर सुरू होण्याच्या आधी 21 दिवस तुम्ही तुमचे तिकीट कॅन्सल करू शकता. असे केल्यास तुमची तीस टक्के रक्कम कापून घेतली जाईल. टूर सुरू होण्याच्या आधी 15 ते 21 दिवस आधी तिकीट कॅन्सल केल्यानंतर पॅकेज कॉस्ट मधून 55% रक्कम कापली जाईल. पॅकेज सुरू होण्याच्या आधी आठ ते 14 दिवसांच्या आधी तिकीट कॅन्सल केल्यास पॅकेज भाडं 80% कापलं जाईल. आणि जर तुम्ही हे पॅकेज सुरू होण्याच्या आधी सात दिवस आधी तिकीट कॅन्सल केलं तर तुम्हाला कोणतीच रक्कम परत मिळणार नाही याची माहिती आधी तुम्ही करून घ्या.

आधीक माहितीसाठी

8287931977 किंवा 8287932122 या क्रमांकावर संपर्क साधू शकता याशिवाय आय आर सी टी सी ची www.irctctourism.com वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता. तिकीट बुक करण्यासाठी https://www.irctctourism.com/tourpackageBooking?packageCode=SMA52 या लिंक वर जाऊन बुकिंग करू शकता.