यंदाच्या हिवाळयात भेट द्या देवभूमीला ; खाण्या-पिण्याचे टेन्शन नाही, IRCTC ने आणले आहे स्वस्त पॅकेज

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यंदाच्या हिवाळी सुट्टीत तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
यावेळी आयआरसीटीसीने देवभूमीला म्हणजेच उत्तराखंडला जाण्याची ऑफर आणली आहे. IRCTC कमी किमतीत देशभरातील प्रेक्षणीय स्थळांना टूर पुरवते. IRCTC कडून बऱ्याच टूर्स चालवल्या जातात. या टूर्स सुरक्षितही मानल्या जातात.

काय असेल कालावधी ?

IRCTC 3 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान देवभूमी उत्तराखंड यात्रा सुरू करणार आहे. दहा रात्री आणि अकरा दिवसांच्या प्रवासासाठी दोन श्रेणींमध्ये भाडे ठेवण्यात आले आहे.

कुठे देणार भेट ?

कोलकाता येथून हा प्रवास सुरू होणार असून वर्धमान, आसनसोल, झाझा, बरौनी, हाजीपूर, गोरखपूर आणि लखनऊ हे ठिकाण बोर्डिंगसाठी ठेवण्यात आले आहे. उत्तराखंडमधील टनकपूर, चंपावत, चौकोरी अल्मोरा, नैनिताल, भीमताल या ठिकाणी सहल केली जाईल.

आयआरसीटीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले की, या प्रकारचा प्रवास 20 वर्षांपासून आयोजित केला जात आहे. लोकांना ते खूप आवडते. यावेळी मागणीनुसार देवभूमीची यात्रा आयोजित केली जात आहे. या प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंगही सुरू झाले आहे. 300 प्रवाशांसाठी बुकिंग केले जाईल आणि IRCTC कडून सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील.

किती येईल खर्च ?

पॅकेज अंतर्गत जर स्टॅंडर्ड तिकीट बुक केले गेले तर त्यासाठी प्रतिव्यक्ती 30,925 रुपये इतका खर्च येईल डीलक्स पॅकेजसाठी अडतीस हजार पाचशे पस्तीस रुपये इतका खर्च येईल जर तुमच्यासोबत ट्रिप मध्ये पाच ते अकरा वर्षांची मुलं असतील तर त्यांच्यासाठी 30,925 रुपये खर्च करावे लागतील तर डीलक्स पॅकेजसाठी प्रतिव्यक्ती 38 हजार 535 रुपये खर्च येईल.

संपर्क ?

8595904074
6290861577