IRCTC : लहान मुलांच्या तिकिटाच्या बाबतीत काय सांगतो रेल्वेचा नियम ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

IRCTC : लहान मुलांना घेऊन जर रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे नियम काय आहेत ? किती वर्षाच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो आणि कोणासाठी तिकीट अनिवार्य आहे ? शिवाय मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास काय आहे नियम ? या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखात देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया…

जरा आपण ट्रेन द्वारे लांबचा प्रवास करणार असलो तर लहान मुलांचे सुद्धा तिकीट काढले (IRCTC) जाते. तसे पाहायला गेल्यास 5 वर्षाच्या आतील मुलांचे तिकीट काढण्याची गरज नसते. रेल्वेच्या नियमानुसार त्यांना मोफत प्रवासाची मुभा आहे. याबरोबरच 5 वर्षे ते वय वर्ष 12 असलेल्या मुलांसाठी हाफ तिकीट काढावे लागते.

तर काढावे लागेल फुल्ल तिकीट (IRCTC)

रेल्वेचा लांबचा प्रवास करणारे अनेक प्रवासी मुलांना घेऊन अडचणीत बसण्यापेक्षा मुलांचे वय जरी कमी असले तरी त्यांच्यासाठी बसण्याची जागा आरक्षित करतात. म्हणजेच मुलांसाठी सीट बुक (IRCTC) केली जाते. मात्र त्यासाठी तुम्हाला फुल तिकीट काढावे लागते. मात्र रेल्वेच्या एका सर्क्युलर नुसार CC, EC, 2S, EA कलास मध्ये बुकिंगची अनुमती नसते.

रेल्वे मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सर्क्युलर नुसार जर पाच वर्षाखालील लहान मूले प्रवास करू इच्छित असतील तर त्याला कोणताही चार्ज आकारला जात नाही. मात्र तिकीट बुक केल्यानंतर फुल सीट (IRCTC) ची किंमत द्यावी लागेल. शिवाय बारा वर्षांवरील मुलांकरिता पूर्ण तिकीट आकारले जाते.

मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास काय आहे नियम ? मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास तुम्हाला पैसे रिफंड केले जातात.